Entertainmentताज्या घडामोडीफिल्मी दुनिया
16 ऑगस्ट 1947 चित्रपटाची पत्रकार परिषद संपन्न…
By Teams /बाबा लोंढे

प्रख्यात दिग्दर्शक ए आर मुर्गदोस यांची निर्मिती असलेला चित्रपट 16 ऑगस्ट 1947 ची पत्रकार परिषद अंधेरी पश्चिम स्थित पीवीआर आयकोन येथे संपन्न झाली. यावेळी चित्रपटाचा ट्रेलर ही लॉन्च करण्यात आला. या पत्रकार परिषदेला डॉ. जयन्तिलाल गडा , निर्माते ए. आर. मुर्गदोस , दिग्दर्शक एन. एस. पोनकुमार आणि वितरक भट्ट हे उपस्थित होते. या चित्रपटातील नायक व नायिका हे शूटिंग मुळे उपस्थित राहू शकले नाहीत.

याप्रसंगी बोलताना निर्माते ए आर मुर्गदोस यांनी सांगितलं की पोनकुमार यांनी जेव्हा कथा ऐकवली तेव्हां हा चित्रपट बनवायला पाहिजे असे वाटले व आम्ही लगेच कामाला लागलो. तसं पाहिलं तर ही एका गावातील सत्य घटनेवर आधारित फिल्म आहे. ही घटना मलाही माहीत नव्हती परंतु मी ही कथा समोर आल्यावर इतिहास चाळला तेव्हां अंगावर शहारे आले. या 16 ऑगस्ट 1947 चित्रपटाचे दिग्दर्शन मी पोनकुमार यांच्यावरच सोपवले. कारण कथा आणि पटकथा त्यांनी लिहली असल्यामुळे ते या विषयाला चांगला न्याय देवू शकतात.
