EntertainmentMovieताज्या घडामोडीमहाराष्ट्रसन्मान कर्तव्याचा
मराठी नाट्यसृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत रंगला मानाचा झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा !!! ‘तिकीट एक प्रयोग अनेक’ झी नाट्य गौरव २०२३!…
मुंबई / विजय कांबळे
मराठी नाट्यसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते अशा प्रतिष्ठित झी नाट्य गौरव २०२३ पुरस्कार सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. या सोहोळ्याचे खास आकर्षण ठरलं ते म्हणजे निलेश साबळेने सादर केलेले ‘हसवा फसवी’ मधील प्रवेश, तसेच या सोहोळ्यात प्रेक्षकांना ‘अश्रूंची झाली फुले, यंदा कदाचित, सही रे सही आणि चारचौघी’ या गाजत असलेल्या हाऊसफुल्ल नाटकांमधील नाट्यप्रवेश पाहता येणार आहेत, तसेच अनेक गोड सरप्राइझेस या नाट्यगौरव च्या निमित्ताने रसिकांना मिळणार आहेत.
तेव्हा एका तिकिटात अनेक प्रयोग पाहण्याची नामीसंधी रसिक प्रेक्षकांना असणार आहे, झी नाट्यगौरव पुरस्कार २०२३ हा सोहळा ९ एप्रिलला संध्या. ७ वा. झी मराठीवर पाहता येणार आहे.