ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसन्मान कर्तव्याचा

पाॅझीटीव्ह पिपल्स फाऊंडेशन’चे संस्थापक ‘सुशिल गायकवाड’ सर सांगतात, “आता एच.आय.व्ही. बाधीत व्यक्तींचं लग्न करण्याचं स्वप्न पूर्ण होईल.”

मुंबई / विजय कांबळे


HIV म्हटल्यावर लोकांना भिती वाटते. आजही HIV वर मात करणारी लस उपलब्ध नाही, हे जरी खरे असले तरी सध्याच्या आधुनिक वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या विविध शोधांमुळे HIV आजारावर नियंत्रण मिळवायला शास्त्रज्ञांना यश आले आहे. तरी देखील लोकांना या आजाराबद्दल अपुरी माहिती असल्यामुळे आणि जागरुकता नसल्यामुळे, अनेक अडचणींमुळे अनेक तरूण तरुणी मानसिक दृष्ट्या खचून जातात. आपला पाॅझीटीव्ह स्टेटस लोकांना माहीत पडेल या भितीने कोणीही लग्नासाठी पुढे येत नाहीत.

अशा परिस्थितीत नाशिक मधल्या ‘सुशिल गायकवाड’ या समाजसेवकाने एक सुंदर उपक्रम राबवायला सुरवात केली. HIV बाधित लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी “पाॅझीटीव्ह पिपल्स फाऊंडेशन” या नावाने संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत त्यांनी अनेक सेवाभावी उपक्रम राबवले. त्यातला सर्वात स्तुत्य उपक्रम म्हणजे “वधु वर सूचक मेळावा”.

HIV बाधित अनेक लोकांचे लग्न करण्याचे स्वप्न सुशील यांनी पूर्ण केले. त्यांनी जवळपास HIV बाधित २०० हुन अधिक जोडप्यांची लग्न लावली आहेत.

‘पाॅझीटीव्ह पिपल्स फाऊंडेशन’ संस्थेचे ‘सुशिल गायकवाड’ सर HIV विषयी सांगतात, “मी गेल्या 2013 पासून HIV बाधित रुग्णांसाठी समाजसेवा करत आहे. आमच्या पॉझिटिव्ह पीपल फाउंडेशन संस्थेतर्फे बीड तसेच नाशिक या ठिकाणी देखील नुकताच विधवा व अनाथ महिलांना मोफत साड्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला व महिलांशी संवाद साधून परिस्थितीशी खचून न जाता पुन्हा लग्न करून नव्याने संसार कसा करता येईल, असा आधार देऊन पीडित महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच काही विधवा व अनाथ मुला मुलींची लग्न देखील संस्थेकडून जुळवण्यात आली. सतत डिप्रेशनमध्ये राहणारी मुलं व मुली अगदी घाबरलेले अवस्थेत आम्ही आता जगणार नाही, आमची समाजात बदनामी होईल… आमच्याकडे आत्महात्येशिवाय पर्याय नाही अशा विचाराच्या मुला मुलींना देखील योग्य मार्गदर्शन करून जगण्याचा सल्ला दिला व अशातच मुंबई मालाड येथे गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घडलेल्या घटनेत बरीच वित्तहानी झाल्यामुळे तेथील निराधार महिलांना देखील दहा साड्या दोन महिन्याचा (रेशन) किराणा देण्यात आला. या संस्थेमार्फत अनेक सेवाभावी उपक्रम राबवले त्यातला सर्वात स्तूत्य उपक्रम म्हणजे वधु वर सूचक मेळावा.”

पुढे ते सांगतात, “लग्न म्हणजे एक पवित्र बंधन..गोड नात्याची सात जन्माची गुंफण..”लग्न” म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या नव्या आयुष्याची नवी सुरुवात..पण हा आनंदाचा क्षण HIV बाधित तरूण तरूणींच्या आयुष्यात यावा, यासाठी आमच्या “पॉझिटिव्ह पीपल फाउंडेशन” संस्थेने पुणे येथे भव्य “वधु वर सूचक मेळावा” आयोजीत केला होता.. यावेळी हजारोंच्या संख्येने आपल्या तरूण तरूणींनी सहभाग नोंदवला.. त्यांना आयुष्याचा जोडीदार मिळावा, यासाठी आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न…HIV बाधित व्यक्ती पुर्ण आयुष्य जगू शकतो, लग्न करू शकतो, निरोगी बाळाला जन्म देऊ शकतो.. तुम्हाला काहीही प्रश्न असल्यास, आमच्या संस्थेच्या विविध उपक्रमात सहभागी व्हायचे असल्यास संपर्क करा.. आणि अखेरीस आत्ताच्या तरुण पिढीला आमचं एवढंच सांगणं आहे की शारीरिक संबंध करताना निरोधचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.”

HIV बाधित लोकांचे लग्न केल्यानंतर त्यांना निरोगी बाळाला जन्म देता येऊ शकतो, यासाठी त्यांची संस्था मार्गदर्शन ही करते. व सदर संस्था ही नाशिक नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात काम करते. अशा समाजसेवकाला सर्वसामान्य लोकांनी, समाजातील मान्यवर मंडळींनी, राजकारणी लोकांनी मदत करणे आणि आधार‌ देणे आज गरजेचे आहे. सुशिल गायकवाड सरांच्या या प्रयत्नांना‌ आमचा सलाम व भविष्यातील समाजसेवेसाठी भरभरून‌ शुभेच्छा.

संपर्क : पॉझिटिव्ह पीपल फाउंडेशन 8007770202 / 9503844666

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये