Entertainmentताज्या घडामोडी

‘कोण होणार करोडपती’च्या विशेष भागात उलगडणार बाप-लेकीचे अनोखे नाते…

जनसामान्यांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘कोण होणार करोडपती’. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य. या आठवड्यात ‘कोण होणार करोडपती’मध्ये शनिवारच्या ‘विशेष भागात’ सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर हॉट सीटवर येणार आहेत. दीपस्तंभ फाउंडेशन या संस्थेसाठी सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत. या पर्वातील हा पहिला विशेष भाग असणार आहे आणि या भागात सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर यांच्याशी गप्पा रंगणार आहेत. या बाप-लेकीबरोबर रंगणाऱ्या गप्पा आणि किस्से पाहणे हे प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. त्याशिवाय ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर दोन सचिन एकत्र असतील. तेही नक्कीच गमतीदार असेल. ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर येणार चिरतरुण व्यक्तिमत्त्व सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर.

चित्रपट सृष्टीत तब्बल ६० वर्षे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते सचिन पिळगांवकर ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत.सचिन पिळगांवकर हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत प्रचंड लोकप्रिय अभिनेते. त्यांनी त्यांच्या अभिनयाचे ठसे त्यांच्या बालपणापासूनच उमटवले आहेत. तसेच श्रिया सुद्धा मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्टीत नावलौकिक आघाडीची अभिनेत्री आहे. चित्रपटांसोबतच काही गाजलेल्या वेब मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आजवर आली. श्रियाकडून आपल्या बाबांविषयीचे काही गमतीदार किस्से प्रेक्षकांना पाहायला/ऐकायला मिळणार आहेत. सचिन खेडेकर यांच्याशी बोलताना अनेक गोष्टी उलगडल्या जाणार आहेत. सचिन पिळगांवकर म्हणले की, त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी वकिलाची भूमिका कधीच केली नाही. पण श्रियाने तिच्या कारकिर्दीची सुरुवात ही वकिलाच्या भूमिकेपासूनच केली. सचिन पिळगांवकर मंचावर आहेत आणि गाणे सादर होणार नाही, हे शक्य नाही. ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर त्यांनी श्रियाबरोबर गाणेही सादर केले आणि ‘कोण होणार करोडपती’चा मंच काही काळासाठी संगीतमय झाला.

‘कोण होणार करोडपती’च्या खेळाबरोबरच सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर यांचे मनोरंजक अनुभव जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका, ‘कोण होणार करोडपती’ विशेष, ३ जून, शनिवारी रात्री ९ वाजता,फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये