बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी किंग्ज पाइप चा ब्रांड अंबासेडर बनला आहे याची माहिती मुंबईतील जुहुच्या जे डब्ल्यू मेरिएट होटेल मध्ये घेण्यात आलेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत किंग्ज पाइप चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री राजेश पटेल यांनी सुनील शेट्टी यांच्या उपस्थितीत दिली.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की सुनील शेट्टी हे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे व फिटनेस मध्येही खूपच केअरिन्ग आहेत त्यामुळं आम्ही त्यांची निवड केली.
अभिनेता सुनील शेट्टी यांनी सांगितले की पर्यावरण आणि जल संधारण या दोन बाबी लक्षात घेवून किंग्ज पाइप ने आपले उत्पादन बाजारात आणले आहे आणि मी पर्यावरण प्रेमी असल्याने त्यांच्या सोबत काम करत आहे. याचा फायदा आपल्या देशातील शेतकऱ्यांना नक्कीच होईल. किंग्ज पाइप सोबत जोडलो गेलो याचा मला आनंद होत आहे.
This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News.
E-mail: ultimatemediaznews@gmail.com