सान्या मल्होत्रा ने तिच्या प्रत्येक चित्रपटातून महिला सशक्तीकरणाची एक वेगळी बाजू मांडली !
दंगल ते कथल: सान्या मल्होत्राचा महिला सक्षमीकरणाचा अनोखा प्रवास !
खर्या अर्थाने ट्रेलब्लेझर अभिनेत्री म्हणून सान्या मल्होत्रा ची भारतीय चित्रपट उद्योगात ओळख आहे. तिने तिच्या चित्रपटातून नेहमीच महिला सक्षमीकरण केलं आहे तिच्या पात्रांच्या आणि चित्रपटांच्या बारीकसारीक निवडीसह ती नेहमीच चर्चेचा विषय ठरली. स्त्रियांना योग्य प्रकाशात घेऊन येऊन तरुण मुलींचा आवाज ती बनते आहे. सान्याचा चित्रपटांमधील तिच्या या अनोख्या पैलू चा हा प्रवास …
दंगल मधून तिने इंडस्ट्रीत पदार्पण केलं आणि तिच्या पहिल्या चित्रपटापासून जिथे तिने रूढीवादी कुस्तीपटूची भूमिका साकारली. पटाखा मध्ये सुद्धा एक अनोखा विषय घेऊन ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. सान्याने नेहमीच सामाजिक विषयवार आधारित आणि महिलांचे चित्रण परिभाषित करणाऱ्या भूमिका निवडल्या आहेत. पगलेट मध्ये तिने पुन्हा सामाजिक संदेश दिला या पलिकडे जाऊन मीनाक्षी सुंदरेश्वरमध्ये तिने आयोजित विवाहाच्या आव्हानांना तोंड देणाऱ्या तरुणीची भूमिका ताकदीने साकारली. तिच्या अलीकडील चित्रपट कथलमध्ये सान्याने निर्भयपणे एका महिला पोलिसाची भूमिका उत्तम साकारली जी एका हाय-प्रोफाइल कथल प्रकरणाच्या दरम्यान फिरते आणि हरवलेल्या मुलीच्या प्रकरणाची चौकशी देखील करते.
सान्या मल्होत्राची फिल्मोग्राफी ही तिच्या कामातून महिलांना सक्षम बनवण्याच्या बनवते यात शंका नाही. तिच्या पात्रांमधील विविधता बघण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. लवकरच तो दोन बड्या कलाकारांसोबत स्क्रीन शेयर करणार असून जवान मध्ये शाहरुख खान आणि सॅम बहादूरमध्ये विकी कौशलसोबत ती दिसणार आहे. तिला या दोन बड्या प्रोजेक्ट्स मध्ये बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे सोबतीने द ग्रेट इंडियन किचनचा हिंदी रिमेक मिसेस देखील ती करणार असून लवकरच तिला या भूमिका मध्ये बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.