रेखा ते मानुषी छिल्लर ग्लोबलस्पा अवॉर्ड्स 2023 मध्ये झळकले सेलिब्रिटी
ग्लोबलस्पा अवॉर्ड्स 2023 च्या रेड कार्पेट वर सेलिब्रिटी ची मांदियाळी
ग्लोबलस्पा अवॉर्ड्स 2023 हा भारताच्या सौंदर्य आणि वेलनेस उद्योगातील लोकांच्या अनोख्या कामाचा उत्सव साजरा करण्यासाठी केला जाणारा अनोखा पुरस्कार होता. बॉलीवूड, क्रीडा, फॅशन आणि संगीतातील नामवंत सेलिब्रिटींना सन्मान करण्यासाठी त्यांचं ग्लॅमर साजर करणारा ग्लोबल स्पा पुरस्कार मोठ्या दिमाखात साजरा झाला.
रेखा, शोभिता धुलिपाला, राशी खन्ना, मानुषी छिल्लर, वाणी कपूर, अपारशक्ती खुराना, राधिका मदन, सैयामी खेर, अंगद बेदी, मनीष मल्होत्रा, खान मल्होत्रा, अर पॉल, खान मनिषा, बी. मलिक, रणदीप हुडा आणि इतर अनेक बड्या कलाकारांच्या उपस्थितीत हा अवॉर्ड सोहळा संपन्न झाला असून कलाकारांनी त्यांच्या फॅशन आणि ग्लॅमरस लूक ने रेड कार्पेट ची शोभा वाढवली.
या दिग्गजांनी केवळ ग्लिट्ज आणि ग्लॅमरच जोडले नाही तर त्यांनी सादरकर्ते आणि विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्राप्तकर्ते म्हणूनही भूमिका बजावल्या. ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट स्पा, सर्वोत्तम सलून, सर्वोत्तम शाकाहारी सौंदर्य ब्रँड, सर्वोत्तम हॉटेल स्पा आणि अश्या अनेक पुरस्कारांचा समावेश होता.