सुमित अरोरा आणि “जवान” च काय आहे नात ?
प्रतिभावान लेखक सुमित अरोरा याने नुकताच सोशल मीडियावर त्याचा नवीन प्रोजेक्ट “जवान” बद्दल चा उत्साह शेअर केला आहे. जवान हा त्याचा साठी नक्कीच खास आहे असं तो म्हणतोय चित्रपटाला शुभेच्छा देतो आहे. त्याने या चित्रपटाविषयी आणि या चित्रपटाच्या अनोख्या प्रवासाबद्दल ची खास गोष्ट यातून शेयर केली आहे.
सुमित अरोराचा उत्साह स्पष्ट आहे कारण त्यांनी “जवान” साठी संवाद लिहिले आहेत. त्यांचा अनुभव आणि त्यांच्या असंख्य प्रोजेक्ट मधला वेगळे पणा यातून त्याने मांडला आहे.
सुमित अरोरा यांनी ते ट्विटरवर ट्विट करून सांगितलं ” अवघ्या काही तासांत #जवान तुमचे सर्वस्व असेल. मी अनेक प्रोजेक्ट्सवर काम केले आहे पण हा खूप खास चित्रपट आहे. मला फक्त जवानांसाठी संवाद लिहिण्यातच मजा आली नाही तर एक सर्जनशील व्यक्ती म्हणूनही मला खूप अफलातून प्रवास अनुभवयाला मिळाला. आजची रात्र एक खास रात्र होती कारण आम्ही एक टीम म्हणून एकत्र चित्रपट पाहिला. उद्याचा दिवस खास आहे कारण चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ! चीफ @Atlee_dir यांचे खास आभार !
सर्जनशील लेखक म्हणून सुमित ची ओळख ही सगळ्यांना माहीत आहे पण जवान हा सुमित साठी एक कमालीचा अनुभव होता हे देखील तितकच खर आहे.