कतरिना कैफला टायगर 3 मधील तिच्या हिट गाण्यासाठी मिळणाऱ्या प्रेमाबद्दल म्हणते ; ‘माझ्यासाठी डान्स करणे ही माझी खरी आवड आहे!’

झटपट हिट प्रीतम यांनी संगीतबद्ध केले आहे, अरिजित सिंग आणि निखिता गांधी यांनी गायले आहे! तामिळ आणि तेलुगू वर्जन बेनी दयाल आणि अनुषा मणी यांनी गायली आहे.
या चार्टबस्टरमधील आकर्षक बीट्स आणि सलमान-कतरिना कैफची झगमगणारी केमिस्ट्री पाहून लोक उत्सुक आहेत.
कतरिना म्हणते, “एक कलाकार म्हणून एवढ्या वर्षापासून, माझ्या चाहत्यांचे, माध्यमांचे आणि प्रेक्षकांचे प्रेम ह्यानेच मला टिकवून ठेवले आहे. यशाचा खरा मापदंड लोकांकडून मिळणाऱ्या प्रेमात आहे. लेके प्रभू का नाम ला पसंत केल जात आहे ही आपल्या सर्वांसाठी एक अद्भुत भावना आहे. माझ्यासाठी डांस करणे ही माझी खरी आवड आहे आणि प्रेक्षकांचे प्रेम पाहणे हा निव्वळ आनंद आहे.”
कतरिना प्रचंड डान्स हिट्स देण्यासाठी ओळखली जाते आणि तिला आनंद आहे की लेके प्रभु का नाम तिच्या गाण्या च्या यादीत सामील होत आहे! तिला वाटते की लोकांना अभिनेत्यांकडून त्यांच्या अभिनय कौशल्याचे प्रदर्शन करत त्यांना आनंद देण्यासाठी आणि डांस करण्यासाठी उत्तम गाणी देण्याची खूप अपेक्षा असते!
कतरिना म्हणते, “एक चित्रपट, एक एक्टिंग परफॉर्मन्स, एखादे गाणे या सर्वांनी आपल्या प्रेक्षकांशी जोडले पाहिजे आणि ते यशस्वी म्हणता येईल आणि माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मला ते मिळाले याबद्दल मी आभारी आहे. मला माहीती आहे की, चित्रपटातील कामगिरीसोबतच आम्ही गाणी पाहण्यासही लोक उत्सुक असतात.”
ती पुढे म्हणते, “मी हे एक मोठे कौतुक मानते कारण गाणी आणि डांस हे आपल्या संस्कृतीचा आणि चित्रपटांचा भाग आहेत आणि ते कायम पसंत केले जातात आणि आवडतात. मला आमच्या गाण्यांकडून लोकांच्या अपेक्षा आहेत याची मला जाणीव आहे आणि त्यामुळे प्रत्येक वेळी चांगला परफॉर्मन्स देण्यासाठी मला प्रोत्साहन मिळते.”
YRF स्पाय युनिव्हर्स मधील टायगर 3 ची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली आहे आणि मनीष शर्मा यांनी दिग्दर्शन केले आहे. या दिवाळीत, 12 नोव्हेंबर, रविवारी हिंदी, तमिळ आणि तेलुगू मध्ये रिलीज होणार आहे!
लेके प्रभू का नाम हे गाणे येथे पहा: