कतरिना कैफ आणि सलमान खानच्या ‘रुआन’ ने जिंकली प्रेक्षकांची मन !

सिनेमॅटिक विश्वात सध्या चर्चा होतेय ती म्हणजे कतरिना कैफ आणि सलमान खान यांच्या टायगर 3 मधील रोमँटिक गाणं “रुआन” याची. सलमान खान सोबत तिच्या मंत्रमुग्ध केमिस्ट्रीने केवळ प्रेक्षकांना मोहित केलं नाही तर ती बॉक्स ऑफिसवर तिचे वर्चस्व देखील मजबूत करत आहे. ब्लॉकबस्टर चित्रपट टायगर 3 ने 100 कोटी कमवून सुपरहिट ठरला आहे.
कतरिना कैफचा बॉलीवूड प्रवास हा कमालीचा आहे तिचे सातत्यपूर्ण बॉक्स ऑफिस यश तिच्या कायम लोकप्रियतेची आणि अभिनयाच्या पराक्रमाची साक्ष देतात. तिच्या मनमोहक अभिनयासाठी आणि जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्ससाठी ओळखली जाणारी ही अभिनेत्री इंडस्ट्रीमध्ये अग्रगण्य आहे. “रुआन” च्या रिलीजने टायगर 3 मध्ये अजून एक कमाल गाण्याची भर केली आहे आणि सलमान खान आणि कतरिना कैफ यांची केमेस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांनी अनुभवली.
कतरिना कैफ च्या टायगर 3 ने 100 कोटी चा गल्ला जमवत ” रुआन” या गाण्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. मनीष शर्मा दिग्दर्शित आणि कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी सोबत मुख्य भूमिकेत असलेला टायगर 3 12 नोव्हेंबर रोजी रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला. आता चाहते विजय सेतुपतीसोबत श्रीराम राघवनच्या “मेरी ख्रिसमस” मध्ये कतरिनाला बघण्यासाठी पुन्हा एकदा उत्सुक झाले आहेत.