अभिनेत्री मानुषी छिल्लरने तिच्या द्वैभाषिक चित्रपट ‘ऑपरेशन व्हॅलेंटाईन’मधील अभिनयाने प्रेक्षकांची जिंकली मन

ब्युटी क्वीन-अभिनेत्री मानुषी छिल्लरला तिचा ॲक्शन-थ्रिलर द्वि-भाषिक चित्रपट ‘ऑपरेशन व्हॅलेंटाईन’ रिलीज झाल्यानंतर प्रचंड प्रेम आणि प्रशंसा मिळत आहे. ज्यात ती वरुण तेज सोबत दिसली आहे. एअरफोर्स रडार ऑफिसर आहानाच्या भूमिकेतून या अभिनेत्रीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले असून भूमिका साकारण्याची तिची अचूकता आणि प्रामाणिकपणा पाहता मानुषी निश्चितपणे 2024 मध्ये अजून उत्तम प्रोजेक्ट करणार यात शंका नाही.
मानुषी आणि वरुण तेज यांच्यातील केमिस्ट्री ने प्रेक्षकांना मोहित केलं असून चित्रपटात मानुषी चा अनोखा अंदाज बघायला मिळतोय. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून मानुषी आणि वरुण यांना ‘ऑपरेशन व्हॅलेंटाईन’साठी कसे उत्तम प्रकारे कास्ट केले गेले आहे याबद्दल लोक स्वत: हून बोलत आहेत.
मानुषीला मिळणारे प्रेम पाहता ती निश्चितच सगळ्यांची लाडकी अभिनेत्री बनते आहे. कामाच्या आघाडीवर तिच्याकडे अक्षय कुमार आणि बॉलिवूडचा सर्वात तरुण अभिनेता सुपरस्टार टायगर श्रॉफ यांच्यासोबत असलेल्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’सह मोठ्या रिलीझ सोबत जॉन अब्राहमसोबत तिचा ‘तेहरान’ही पाइपलाइन मधला उत्कठावर्धक प्रोजेक्ट आहे.