आमदार डॉ. भारती लवेकर वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील भगवान श्री रामाच्या भव्य अभिषेक सोहळ्याचे थेट प्रक्षेपण अनेक भाविकांनी घेतले दर्शन…
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान, आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी आणि संत महंतांच्या उपस्थितीत अयोध्येतील मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम यांच्या जन्मस्थानी प्रभू श्री रामांच्या प्राणप्रतिष्ठापनेचा नेत्रदीपक सोहळा वर्सोवा, एस व्ही रोड, जोगेश्वरी पश्चिम येथील दिल्ली दरबार हॉटेल समोरील मैदानात प्रभू श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन केले होते वर्सोव्यात प्रति आयोध्याची प्रतिकृती उभारली होती. तसेच सुंदर पाठ आणि श्री राम नामाचे पठण,अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापनाच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण,श्री.सत्यनारायण महापूजा आणि होम हवन,भाविकांसाठी महाभांडारा व भजनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या सगळ्या कार्यक्रमाचा भाविकांनी सकाळ पासूनच लाभ घेतला.वर्सोव्यातील विविध जाती धर्माच्या नागरिकांनी येथे गर्दी केली होती.व सुमारे २० हजार भाविकांनी महाभंडाराचा लाभ घेतला.
तसेच या कार्यक्रमस्थळी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी भेट देऊन महाआरती केली आणि रामनामाचा जयघोष केला. आमदार आशिष शेलार म्हणाले की,ज्या प्रकारे आमदार लव्हेकर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा आखली आहे व भाविकांना आनंद देण्याचा त्यांचा प्रयत्न वाखडण्या जोगा आहे. वर्सोव्यात अयोध्येच्या श्री राम मंदिराची भव्य प्रतिकृती साकरल्याबद्धल आणि येथील वातावरण राममय केल्या बद्धल शेलार यांनी आमदार लव्हेकर यांचे भरभरून कौतुक केले.
यावेळी आमदार डॉ. भारती लव्हेकर म्हणाल्या की, ज्या राम भक्तांना हा सोहळा अनुभवायचा आहे,मात्र तिथपर्यंत पोहचता येणार नाही,अशा वर्सोवाकरांसाठी आम्ही येथे अयोध्येच्या राम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली आणि प्रभू श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण येथील राम भक्तांना दाखवले.तर सकाळी अंध भजन मंडळीने सुमारे दीड तास भजन साकारून श्रीरामाचा येथे जयघोष केला