EntertainmentMovieताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘घर बंदूक बिरयानी’मध्ये झळकणार खरेखुरे पोलीस….

मुंबई / विजय कांबळे

सध्या जोरदार चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे ‘घर बंदूक बिरयानी’. आतापर्यंत हा चित्रपट कशावर आधारित आहे, याची प्रेक्षकांना कल्पना आली असेलच. मुळात नागराज मंजुळे यांचा चित्रपट म्हणजे चौकटीबाहेरचा चित्रपट, हे आता समीकरणच बनले आहे. या चित्रपटात नागराज पोपटराव मंजुळे यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली असून ते एका तडफदार, प्रामाणिक पोलीस अधिकाराच्या भूमिकेत झळकत आहेत. त्यांचा हा ‘ॲक्शन हिरो’चा अंदाज त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडला असून या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. या चित्रपटात नागराज मंजुळे यांचे जे सहकारी पोलीस अधिकारी आहेत, त्यातील काही पोलीस हे खऱ्याखुऱ्या आयुष्यातही पोलीसच आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून रिअल पोलीस रिलमध्ये दिसणार आहेत.

नागराज मंजुळे यांच्या चित्रपटात प्रेमकथा असली तरी ते चित्रपट एका विशिष्ट विषयावर भाष्य करणारे, वेगळ्या धाटणीचे असतात. यात नवोदितांना संधी देणे, अभिनयात गावकऱ्यांना प्राधान्य देणे ही नागराज मंजुळे यांची खासियतच असते. त्या विषयाला वास्तविकतेचा स्पर्श व्हावा, तो विषय प्रेक्षकांना आपल्या जवळचा वाटावा, यासाठी त्यांचा हा प्रयत्न असतो. हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’ ही त्याला अपवाद नाही. या चित्रपटात पोलीस आणि डाकूंची चकमक दिसत आहे. हे डाकू हुबेहूब दिसावेत, यासाठी महाराष्ट्रातील विविध भागांतील कलाकार ज्याप्रमाणे त्यांनी वेचले. त्याप्रमाणेच पोलीसही खरे वाटावेत, म्हणून त्यांनी काही रिअल पोलिसांनाच अभिनयाची संधी दिली. यात कोणी त्यांचा भाऊ आहे, कोणी मित्र आहेत. त्यामुळे आता इतर चित्रपटांप्रमाणेच हा चित्रपटही रिअॅलिस्टिक असणार, हे नक्की !

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, आटपाट निर्मित ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून यात नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील, दीप्ती देवी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये