राष्ट्रीय पुरस्कार-विजेता रॉकस्टार डीएसपी अजय देवगण, आर. माधवन आणि ज्योतिका यांच्या सोबतीने करणार नवा प्रोजेक्ट ….
राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीत सेन्सेशन रॉकस्टार डीएसपी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाले आहेत. पुनरागमन करण्याच्या तयारीत असताना भारतीय चित्रपटसृष्टीत नवा उत्साह निर्माण झाला आहे. अजय देवगण, आर. माधवन आणि ज्योतिका या त्रिकूटाने अभिनीत तो नवा प्रोजेक्ट करणार आहे. विशेषतः रॉकस्टार डीएसपी आणि अजय देवगण यांनी ‘दृश्यम 2’ मध्ये एकत्र काम केल्यानंतर आता नवीन काय असणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे.
रॉकस्टार डीएसपी त्याच्या भावनिक सुरांसाठी प्रसिद्ध आहे.दृष्यम 2 मध्ये अजय देवगणसोबतच त्याच काम हिट ठरल होत.
मनमोहक कथा आणि अविस्मरणीय संगीताने परिभाषित केलेल्या उद्योगात रॉकस्टार डीएसपीचे सहकार्य निश्चित यशाचे आश्वासन देते. डीएसपीची च्या गाण्याची जादू हमखास आहे यात शंका नाही. दिग्गजां सोबत असलेला हा नवा प्रोजेक्ट नक्की काय असणार ज्याची चाहत्यांनी उत्सुकता आहे.