दरोगा हप्पू सिंगला नवरात्री उत्सवादरम्यान प्रेक्षकांकडून मिळाले भरपूर प्रेम!
नवरात्री हा भारतातील सर्वात खास सणांपैकी एक आहे, जो अनेक राज्यांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मध्य प्रदेशात, हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो, भक्त नऊ दिवसांचा उपवास करतात, दुर्गा देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची आराधना करतात आणि आपल्या प्रियजनांसह गरबा खेळण्यासाठी विविध स्थानिक दांडिया मैदानांवर गर्दी करतात. यंदा, एण्ड टीव्हीवरील मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मध्ये दरोगा हप्पू सिंगची भूमिका साकारण्यासाठी लोकप्रिय असलेले योगेश त्रिपाठी मध्यप्रदेशमधील उत्सवी साजरीकरणामध्ये सामील झाले. त्यांनी सण साजरा करण्यासाठी ग्वाल्हेरला भेट दिली, स्थानिक उत्सवी उत्साहाचा आनंद घेतला, सर्वांसोबत गरबा नृत्य देखील केले. नवरात्री साजरीकरणादरम्यानच्या या अनुभवाबाबत अभिनेत्याने त्याचे मत व्यक्त केले आहे.
दरोगा हप्पू सिंग म्हणून लोकप्रिय असलेले योगेश त्रिपाठी त्यांचा उत्साह व्यक्त करत म्हणाले, ”ग्वाल्हेरमधील उत्सवी वातावरणाने माझे मन जिंकले आहे. गेल्या वर्षी नवरात्रीदरम्यान मी शहरातील उत्साहपूर्ण वातावरण पाहून भारावून गेलो. या वर्षी पुन्हा एकदा नवरात्री साजरीकरणामध्ये सामील होण्याचा अनुभव अद्भुत होता. मी उपस्थित लोकांनी माझ्यावर केलेला आपुलकी व प्रेमाचा वर्षाव पाहून भारावून गेलो. गरबादरम्यान लोकांना पारंपारिक पेहराव करत गरबा नृत्य करताना पाहून खूप आनंद झाला आणि त्यांची ऊर्जा पाहून मला देखील गरबा नृत्य करावेसे वाटले. त्यांना पाहून मला खूप आनंद झाला आणि मी देखील उत्सवी उत्साहामध्ये सामील झालो. मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील माझी भूमिका दरोगा हप्पू सिंगप्रती लोकांचे प्रेम प्रकर्षाने दिसून आले, जेथे त्यांनी माझ्याशी बुंदेलखंडी भाषेमध्ये संवाद साधला. काहीजणांनी विचारले ‘कितनी न्योच्छावर लेंगे आप?’ (हसतात) मी उत्साहाने उत्तर दिले, ‘इस बार बस प्यार की न्योच्छावर लेंगे हम’. ग्वाल्हेरचा संपन्न ऐतिहासिक वारसा, तसेच येथील लोकांचा स्वागतार्ह स्वभाव या गोष्टींनी माझी भेट संस्मरणीय केली. भव्य ग्वाल्हेर किल्ला आणि स्थानिक हस्तकला व कापडासाठी प्रसिद्ध गजबजलेल्या पाटणकर बाजारामध्ये फेरफटका मारण्याचा अनुभव उत्साहवर्धक होता. फूडप्रेमी असल्याने मी गोड इमार्तिस, कुरकुरीत कचोरी व पोहा जिलेबीचा मनसोक्त आस्वाद घेतला. ही ट्रिप माझ्या मनात सदैव स्मरणात राहिल आणि मी पुन्हा एकदा ग्वाल्हेरला भेट देत उत्सवी उत्साहामध्ये सामावून जाण्यास उत्सुक आहे.”
योगेश त्रिपाठी यांना दरोगा हप्पू सिंगच्या भूमिकेत पाहण्यासाठी पाहत राहा ‘हप्पू की उलटन पलटन’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री १०.३० वाजता फक्त एण्ड टीव्हीवर!