घूमरचे मर्यादित स्क्रीन रिलीझ वाढणार का ?..
" घुमर " ला अजून स्क्रीन मिळणार का ?...
आर बाल्की यांचा ‘घूमर’ हा चित्रपट जाहीर झाल्यापासूनच चर्चेत आहे. अभिषेक बच्चन, शबाना आझमी, सैयामी खेर आणि अंगद बेदी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट १८ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. सुरुवातीच्या पासून घूमरने बुल्स आय हिट केले आहे आणि 2023 च्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी तो चित्रपट ठरला आहे. सोशल मीडिया असो किंवा बातम्या मध्ये घुमर ची चर्चा बघायला मिळते.
आता, अशी बातमी आहे की माऊथ पब्लिसिटी आणि प्रेक्षक, समीक्षक आणि जागतिक क्रिकेट आयकॉन्सच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने अनेक चित्रपट वितरकांनी चित्रपटासाठी अधिक स्क्रीन उपलब्ध करून देण्यासाठी निर्मात्यांशी संपर्क साधला आहे. या घडामोडीच्या बद्दल सांगताना सूत्रानुसार कळतंय “आर बाल्कीचा घूमर हा मर्यादित रिलीज होणारा चित्रपट असेल परंतु भारतभर चित्रपटासाठी प्रेमाचा वर्षाव होत आहे, अनेक ज्ञात चित्रपट वितरकांनी निर्मात्यांना त्यांच्या इच्छेनुसार संपर्क साधला आहे. अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर स्टाररच्या शोची संख्या वाढवा.” अस म्हटल जात आहे.
आता घूमर ला अजून किती स्क्रीन मिळणार हे बघणं उत्सुकतेच ठरणार आहे.