Serialताज्या घडामोडी
कलर्स मराठीवरील काव्या आणि अंजलीच्या जीवावर बेतणार…

कलर्स मराठीवरील ‘काव्यांजली- सखी सावली’ या लोकप्रिय मालिकेचा या रविवारचा महाएपिसोड काव्या आणि अंजली या दोन जीवाभावाच्या बहीणींच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ करणारा ठरणार आहे.
या महाएपिसोडमध्ये अंजलीच्या नवऱ्याची माजी प्रेयसी ‘निकिता’ने खेळलेला एक जीवघेणा डाव अंजली बरोबरच काव्याच्या जीवावरही बेतणार आहे. अनपेक्षितपणे हा डाव यशस्वी करण्यासाठी ‘श्रेष्ठा’ची ही साथ लाभणार आहे. या संकटातून यादोघी बहिणी मार्ग काढू शकतील की त्यांची साथ कायमची सुटेल ? प्रीतम आणि विश्वजित त्यांच्यापर्यंत पोहचून त्यांना वाचवू शकतील का ? अशी खिळवून ठेवणारी थरारक गोष्ट या महाएपिसोडमध्ये पाहता येईल.
नक्की पाहा, ‘काव्यांजली- सखी सावली’, महारविवार, ११ फेब्रुवारी, दु. २.०० वा. आणि रात्री. ८.०० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.