अविस्मरणीय केमिस्ट्री आणि अपवादात्मक दिग्दर्शन यांचा संगम असलेला आनंद एल राय, धनुष आणि सोनम कपूर यांचा रांझणा !
प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडणारा रांझणा !

चित्रपट क्षेत्रात उत्तम कथा आणि कमालीचं दिग्दर्शन हे महत्त्वपूर्ण मानलं जातं. 2013 मध्ये रिलीज झालेल्या रांझणा या रोमँटिक चित्रपट असाच काहीसा होता. धनुष आणि सोनम कपूर यांची कमालीची अक्टिंग असो किंवा आनंद एल राय यांच आकर्षक दिग्दर्शन या दोन्ही गोष्टीने चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री देखील तितकीच उत्तम होती आणि म्हणून ही प्रेम कथा अविस्मरणीय ठरली.
तनु वेड्स मनू, तनु वेड्स मनु रिटर्न्स, अतरंगी रे, गुडलक जेरी, अॅन अॅक्शन हिरो, हॅप्पी भाग जायगी, न्यूटन टू तुंबड आणि बरेच काही मधील आनंद एल राय यांनी दिग्दर्शित केलेले काही अविस्मरणीय चित्रपट आहेत. या चित्रपटाने सगळ्यांची मन जिंकली आणि सुपरहिट ठरला. आनंद एल राय यांनी रांझणा साठी कोणतीही कसर सोडली ना सोडता चित्रपट उत्तम केला यात शंका नाही. साऊथ चित्रपटांच्या क्रेझने आपल्या हृदयात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे आणि धनुष साठी हा पहिला बॉलीवुड चित्रपट होता रांझना ने त्याचं बॉलीवुड मधल पदार्पण दमदार ठरलं.
प्रसिद्ध दक्षिण भारतीय अभिनेता धनुषच बॉलीवूड पदार्पण ‘रांझणा’ या चित्रपटातून झाल. त्याची कुंदन शंकर ही भूमिका देखील लोकांना आवडली.धनुषच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली. सोनम कपूर, तिच्या लालित्य आणि मोहकतेसाठी ओळखली जाते तिने झोया हैदरच्या भूमिकेत अगदी सहजपणे पार पाडली.
धनुष आणि सोनम कपूरचा ” रांझणा ” मधील अभिनय प्रेक्षकांच्या आठवणींमध्ये कायमस्वरूपी राहिला. आज बघता बघता या सुपरहिट चित्रपटाला 10 वर्ष झाली. दहा वर्षां नंतर देखील या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकां मध्ये कायम आहे. धनुष आणि सोनम च्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीने चित्रपटाला नवीन उंचीवर नेले आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला !