झी मराठी अवॉर्ड मध्ये माधुरी दीक्षित आणि मलायकाची मराठमोळी अदा !
मलायकाचा परफॉर्मन्स फाडू, सलील दादाला मिळेल का तिच्या हातचा लाडू?

झी मराठी अवॉर्ड्स म्हणजेच नात्यांचा महाउत्सव आणि ह्या उत्सवात हजेरी लावली ती बॉलीवूडच्या तारका ‘मलायका अरोरा’ आणि धक धक गर्ल ‘माधुरी दीक्षित’ यांनी. माधुरी आणि मलायका ह्या दोघीही या घरच्या उत्सवात अगदी मराठमोळया अंदाजात सहभागी झाल्या. मलायकाचं कोळी नृत्य हे या कार्यक्रमाचं खास आकर्षण ठरलं. एवढच नाही तर श्रेया बुगडे कडून बेसनाचे लाडू बनवायला शिकून मलायका हे खास लाडू सारेगामा लिटिल चॅम्प्सचे परीक्षक सलील कुलकर्णींना देणार आहेत. माधुरी दीक्षितनेही झी मराठीच्या सर्व नायिकांसोबत मंगळागौर साजरी केली. सोबत रंगली ती माधुरी, भाऊ कदम आणि भुवनेश्वरीची हास्याची जुगलबंदी. ह्या कार्यक्रमाच्या निवेदनाची धुरा सांभाळली ती म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी जोडी अक्षरा आणि अधिपती यांनी.
हे सर्व धमाकेदार परफॉर्मन्स पाहण्याची प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता लागली असेल, तेव्हा शनिवार ४ नोव्हेंबर संध्या. ७ ह्या तारखेची नोंद आपल्या कॅलेंडर नक्की करून ठेवा. घरचं कार्य आहे सहकुटुंब सर्वाना आग्रहाचं निमंत्रण.