Entertainmentक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीफिल्मी दुनियामहाराष्ट्र

रिलायन्स स्मार्ट बाझार ने ‘फुलराणी’ साठी केलं मर्चंटायझिंग…

मुंबई/ विजय कांबळे

‘हिरवे हिरवे गार गालिचे…’ हे बालकवींच्या सिद्धहस्त लेखणीतून अवतरलेले अजरामर काव्य गुणगुणत ‘फुलराणी’ येणार असल्याचं सर्वांनाच ठाऊक आहे. ‘फुलराणी’चा फर्स्ट लुक रिव्हील झाला. विनोदी शोच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पोहोचलेली सर्वांची लाडकी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर ‘फुलराणी’च्या रूपात रसिकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सिनेरसिकांवर मोहिनी घालणाऱ्या ‘फुलराणी’साठी रिलायन्स स्मार्ट बाझारनेही पुढाकार घेतला आहे. या चित्रपटात प्रियदर्शनीसोबत सुबोध भावे मुख्य भूमिकेत असल्याने दोघांचे खास फोटो असलेले किचेन्स, कॅाफी मग तसेच झगा मगा मना बघा स्पेशल टी-शर्टस, शॅापिंग बॅग्ज, कॅप्स, जॅकेट्स ‘फुलराणी’ साठी रिलायन्स स्मार्ट बाझारने एक्सक्लुझिव्हपणे मर्चंटायझिंग केल्या आहेत. ‘फुलराणी’च्या या एक से एक वस्तू स्मार्ट बाझारच्या आउटलेट्स मधून खरेदी करता येणार आहेत.

आजघडीला मराठीतील सर्वात मोठी आणि महत्त्वाची फिल्म असलेल्या ‘फुलराणी’च्या प्रमोशनसाठी अनोखी संकल्पना राबवण्यात आली आहे. ‘फुलराणी’च्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या सर्व वस्तू मुंबई-नवी मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि पुण्यातील सात स्टोर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ‘फुलराणी’ या मराठी चित्रपटासाठी प्रथमच एका नॅशनल कंपनीने पुढाकार घेत मर्चंटायझिंग केलं असून चित्रपटाच्या प्रमोशनची वेगळी हवा केली आहे. स्मार्ट बाझारच्या माटुंगा, दत्तानी वसई, विवियाना ठाणे, कल्याण मेट्रो जंक्शन, डोंबिवली एक्स्पिरिया मॉल, सीवूड, ओरियन मॉल पनवेल, कोथरूड, अलमॉन्टे स्मार्ट स्टोर, पिंपरी प्रिमियर प्लाझा, कुमार स्पेसिफिक, अमनोरा, औंध वेस्टर्न मॉल स्मार्ट स्टोर, विश्रांतवाडी या ठिकाणी या वस्तू उपलब्ध आहेत.

‘फुलराणी’च्या या अनोख्या प्रमोशन संकल्पनेबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक विश्वास जोशी म्हणाले की, चित्रपटाच्या संपूर्ण टिमसाठी ही अत्यंत आल्हाददायक आणि आनंददायी बाब आहे. प्रमोशन हे खऱ्या अर्थाने चित्रपट आणि रसिक यांच्यातील दुवा असते. त्यामुळे ज्यांच्यासाठी चित्रपट बनवला गेला त्यांच्यापर्यंत तो वेगवेगळ्या युक्त्यांच्या माध्यमातून पोहोचवणं गरजेचं असतं, जेणेकरून कलाकृती हिट होण्याची शक्यता वाढते. रिलायन्स स्मार्ट बाजारने ‘फुलराणी’ चित्रपटासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं शक्य होणार आहे. त्यामुळे ‘फुलराणी’च्या प्रमोशनची ही अनोखी संकल्पना भविष्यात आणखी काही मराठी चित्रपटांसाठीही फायद्याची ठरू शकेल यात शंका नाही.

पिग्मॅलिअन’ या गाजलेल्या नाट्यकृतीवर १९६४ साली आलेली ‘माय फेअर लेडी’ ही म्युझिकल फिल्म ही चांगलीच गाजली होती. याच ‘पिग्मॅलिअन’ कलाकृतीने प्रेरित होऊन विश्वास जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली ‘फुलराणी…अविस्मरणीय प्रेम कहाणी’ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. ‘फिनक्राफ्ट मिडिया’ ‘अमृता फिल्म्स’ आणि ‘थर्ड एस एंटरटेन्मेंट’ने चित्रपटाची प्रस्तुती केली असून विश्वास जोशी, अमृता राव, श्वेता बापट चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. जाई जोशी, श्री.ए.राव, स्वानंद केळकर या चित्रपटाचे निर्माते आहेत. या कलाकृतीचे लेखन विश्वास जोशी व गुरु ठाकूर यांनी केले आहे.गीते बालकवी, गुरु ठाकूर, मंदार चोळकर यांची असून संगीत निलेश मोहरीर आणि वरुण लिखाते यांचे आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचं आहे. अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, प्रियंका बर्वे, हृषिकेश रानडे, आनंदी जोशी, शरयू दाते यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. छायांकन केदार गायकवाड तर संकलन गुरु पाटील आणि महेश किल्लेकर यांचे आहे.

२२ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या ‘फुलराणी’ चित्रपटाचे वितरण वायकॉम १८ स्टुडिओ करणार आहे.

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये