“सन मराठी” कडून ‘बक्षिसांचा वर्षाव’, सुरू होत आहे महामालिकेचं पर्व…..
मुंबई / विजय कांबळे

सन टिव्ही नेटवर्कची सन मराठी ही वाहिनी अवघ्या दीड वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली. सोहळा नात्यांचा हे ब्रीदवाक्य असणाऱ्या या वाहिनीने आपल्या प्रेक्षकांसाठी नात्यांनी सजलेल्या वेगवेगळया मालिका आणल्या. सन मराठी घेऊन आलं आहे, ‘महाराष्ट्राची महामालिका’ हा उपक्रम ज्यात प्रेक्षकांसाठी दर आठवड्याला असणार मनोरंजनाची मेजवानी, सोबत बक्षिसं जिंकण्याची सुवर्णसंधी.
या उपक्रमाच्या पहिल्या आठवड्यात ‘बघा रोज, जिंका रोख!’ ही स्पर्धा प्रेक्षकांना भरघोस बक्षिसे मिळवून देणार. या स्पर्धेत दर दिवशी मालिकेसंबंधित एक प्रश्न प्रेक्षकांना विचारला जाईल आणि या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांनी मालिकेदरम्यान दाखवण्यात येणाऱ्या नंबरवर मिस कॉल देऊन नोंदवायचं आहे. अचूक उत्तर देणाऱ्या १०० विजेत्यांना तब्बल लाख रुपयांची बक्षिसं दिली जाणार आहेत.. दुसऱ्या आठवड्यात महामालिकेचे ब्रेक-फ्री भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या उपक्रमाच्या तिसऱ्या आठवड्यात एक पाहुणा कलाकार महापालिकेतून सन मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या उपक्रमाच्या चौथ्या आठवड्यात मालिकेचे अनेक पैलू उलगडताना दिसणार आहेत. म्हणून हा आठवडा महासप्ताह ठरणार आहे. या आठवड्यात प्रेक्षकांसाठी मालिकेचा खास महाएपिसोड वाहिनी घेऊन येणार आहे.या उपक्रमाची सुरुवात आज २७ फेब्रुवारी पासून कन्यादान या मालिकेपासून सुरुवात होणार आहे.
सन मराठी ह्या वाहिनीवर प्रेक्षकांना नात्यांनी सजलेल्या वेगवेगळ्या मालिका संध्याकाळी ७ ते रात्री ११. ०० ह्या वेळेत पाहायला मिळतील. सन मराठीवर संध्याकाळी ७.३० वाजता ‘जाऊ नको दूर… बाबा!’, ८.३० वाजता ‘कन्यादान’, रात्री ९ वाजता ‘संत गजानन शेगावीचे’, तसेच रात्री १० वाजता ‘सुंदरी’, तर १०.३० वाजता नंदिनी ह्या मालिका दाखविल्या जातात…