ताज्या घडामोडी

नेहा जोशीचा विवाहानंतर पहिला ‘गुढी पाडवा’….

मुंबई / विजय कांबळे

गुढीपाडवा हा सण मराठी नववर्षाच्‍या शुभारंभाचे प्रतीक आहे आणि महाराष्‍ट्रीयन लोकांसाठी आनंदाचा सण आहे. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण घरात भरभराट आणि सौभाग्य घेऊन येण्‍याच्‍या विश्‍वासासह साजरा केला जातो. एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘दूसरी मॉं’मध्‍ये यशोदाची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा जोशी महाराष्‍ट्रातील नाशिक येथील आहे. ती तिच्‍या विवाहानंतर पहिल्‍यांदाच हा सण साजरा करण्‍यासाठी उत्‍साहित आहे. नेहा जोशी यंदाच्‍या सण साजरीकरणाबाबत सांगताना म्‍हणाली, ‘‘गुढीपाडवा सण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दिवसाच्या सुरुवातीला, प्रत्येक महाराष्ट्रीयन कुटुंब हार, कडुलिंबाची पाने व चमकदार कापडाने सजवलेली गुढी उभारतात. गुढी दुष्‍ट शक्‍तींना दूर ठेवते आणि समृद्धी व चांगले भाग्य आणते असे मानले जाते. ही गुढी नवीन सुरुवात, आशा आणि आकांक्षांचे देखील प्रतीक आहे. तसेच लोक रांगोळ्या, रंग आणि फुलांनी त्यांची घरे सजवतात. विवाहानंतर हा माझा पहिला गुढीपाडवा असल्याने ओंकार आणि मी यावर्षी माझ्या माहेरी जाणार आहोत. या दिवशी आईवडिल आपल्या नवविवाहित मुलीला आणि त्यांच्या पतीला जेवणासाठी आमंत्रित करतात. पुरणपोळी, श्रीखंड यांसारखी मिष्टान्ने आणि आंबे डाळ व सुंठपाक हे पदार्थ यादिवशी बनवले जातात. मी माझ्या आईकडे या सर्वांची मागणी केली आहे (हसते). ती एक अप्रतिम कूक आहे आणि मी जयपूरमध्ये माझ्या ‘दूसरी मॉं’ मालिकेच्‍या शूटिंगमध्‍ये व्‍यस्‍त असल्‍यामुळे मला माझ्या आईने बनवलेल्‍या जेवणाची आठवण येत आहे. पारंपारिक महाराष्ट्रीयन पोशाख, नऊवारी साडी, सुंदर दागिने आणि केसात मोगऱ्याच्या फुलांचा हार घालून माझा लूक पूर्ण करत मी सणाचा आनंद घेण्‍यासाठी उत्‍सुक आहे.’’

अभिनेत्री पुढे म्‍हणाली, ‘‘सायंकाळी आम्‍ही आमच्‍या नातेवाईकांना भेटायला जातो, तसेच फेरफटका मारायला देखील जातो. सर्वात महत्त्वाचे म्‍हणजे या शुभ सणाला मंदिरामध्‍ये जाऊन देवाचा आशीर्वाद घेतो. या दिवशी शहराचे आराध्य दैवत असलेल्या कलाम मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची नाशिकमधील परंपरा आहे. पण, शोभा यात्रा पाहणे खरंच पर्वणी आहे, ज्‍यामध्‍ये महिला आकर्षक पोशाख परिधान करतात, हातामध्‍ये झेंडे धरतात आणि ढोल-ताशा वाजवतात. माझ्याकडून सर्वांना गुढीपाडव्‍याच्‍या शुभेच्‍छा. हे वर्ष तुम्हाला सुख, आरोग्य आणि संपत्ती घेऊन येवो.’’

नेहा जोशीला यशोदाच्‍या भूमिकेत पाहण्‍यासाठी पहा ‘दूसरी मॉं’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजता फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर!

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये