“चला हवा येऊ द्या ” या मनोरंजक कार्यक्रमात होणार एका थोर व्यक्तीचे आगमन….
मुंबई. / विजय कांबळे
झी मराठीच्या “चला हवा येऊ द्या” च्या मंचावर नेहमी हास्याचे कारंजे उडतच असतात व ह्या कार्यक्रमाची टीम प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडते. आता प्रेक्षकांसाठी एक खास बातमी म्हणजे येणाऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ह्या कार्यक्रमात गौर गोपाळ दास ह्यांचे आगमन होणार आहे.
गौर गोपाळ दास ह्यांचा बद्दल सांगावे तितके कमीच आहे, एक असे व्यक्तीमत्व जे जीवनशैली कशी सकारात्मक असावी त्या बद्दल ते प्रेरणात्मक विचार मांडत असतात. त्यांच्या आगमनाची झलक प्रेक्षकांनी प्रोमो मध्ये पाहीलीच आहे .मनोरंजनाबरोबरच आयुष्य खुप सुंदर आहे या विषयी सांगताना गौर गोपाल दास आपल्याला खळाळून हसवतील व त्यातून आपल्याला बोधही मिळेल यात शंकाच नाही. तेव्हा पहायला विसरू नका “चला हवा येऊ द्या” सोमवार आणि मंगळवार रात्री ९:३० वाजता फक्त झी मराठी वर.
https://www.instagram.com/reel/Crkcqx1obD6/?igshid=YmMyMTA2M2Y=