ताज्या घडामोडी

वसईतील नृत्याचार्याने केले भरतनाट्यमात 3 विश्वविक्रम…..

By Teams/ प्रणव बिर्जे

शुक्रवार 5 मे 2023 बुद्धपौर्णिमेला पुद्दुचेरीत रॉक बीच येथे भरतनाट्यम नृत्यात 2860 नृत्यांगनी आनंद तांडव डमरू साहित्य सदर करुण 3 विश्वविक्रमात नोंदणी केले. हया विश्वक्रमात भारत, अमेरिका, जर्मनी, मलेशिया, श्रीलंका फ्रान्स, दुबई सारख्या 11 हुन अधिक देशांतील कलाकारांनी समावेश घेतला होता
संगमम ग्लोबल अकादमी चे संस्थापक दिनेश कुमार ,अन्नामलाई विद्यापिठच्या संगीत विभागाच्या प्राध्यापिका डॉ चित्रा ह्यानी अयोजित केलेल्या हा कार्यक्रमात पुदुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगस्वामी तसेच बांधकाम विभाग आणि पर्यटन मंत्री के लक्ष्मीनारायण ,इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे निर्देशक श्री गोपाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होते.

त्यात वसईतील श्रीमती रोहिणी चव्हाण बॅनर्जी हिने सामुहिक नृत्यात सहभाग घेवुन ९ मिनीटाचे आनंद तांडव डमरू साहित्य सदर करुन unique विश्वविक्रम, लिम्काबुक्स ऑफ रेकॉर्ड आणि आर्ट बुक्स ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव समिल करुन घेतले आहे. नृत्यात मुखमंत्र्यंकडून त्यांना नृत्य आचार्य ह्या उपाधीने सन्मानित करण्यात आले. आता वाटचाल गिनीज रेकॉर्डकडे अस त्या म्हणतात.ह्या आधीही त्यांनी 2022 मध्ये लंडनच्या बुक रेकॉर्ड मध्ये आपले नाव सामील करून घेतले आहे.भरतनाट्यम नृत्याचा जागतीक स्तरावर प्रचार करण्‍याच्‍या उध्‍देश ह्या कार्यक्रमातून होता.

रोहिणी ने शिक्षण बालक विहार विद्यालय कांदिवली येथुन केले असुन पदवी ठाकूर महाविद्यालय मधुन घेतली आहे. सुप्रसिद्ध डॉ श्रीमति किशू पाल ह्याच्याकडून नृत्य प्रशिक्षण घेतले आहे तसेच त्यांच्या नृत्यालिका संस्थेशी संलग्न करुण स्वतःची कृष्णाक्षि भरनाट्यम नृत्य अकादमी हा त्या वसई नालासोपारा मध्ये चालवतात.

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये