संकल्प 2023-24 सह तुमचा कायदेशीर प्रवास पूर्ण करा!
अभिनेता सोनू सूद देणार लॉ शिक्षण मोफत !
संकल्प हा एक अनोखा आणि मोफत कायदा प्रवेश प्रशिक्षण कार्यक्रम आहे जो अनेकांना त्यांच्या व्यावसायिक कायदेशीर शिक्षण घेण्यास आणि राष्ट्रीय कायदा विद्यापीठांमध्ये (NLUs) एक प्रतिष्ठित स्थान मिळवण्यासाठी सक्षम करणार आहे.
‘संकल्प’बद्दल बोलताना सोनू सूद म्हणतो ” ज्या लोकांना कायद्याची करिअर म्हणून निवड करायची आहे त्यांना गाईड करण्यासाठी देवाने माझी निवड केली आहे हे पाहून मला खूप आनंद होतो. मला खात्री आहे की आपला देश नक्कीच सुरक्षित आणि सक्षम हातात असेल.”
ज्यांना कोविड मध्ये नुकसान सहन करावे लागले आहे किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून (EWS) आले आहे अश्या विद्यार्थ्यांना यात प्राधान्य दिले जाणार आहे.
या अनोख्या संधीचा फायदा सर्व 11वी, 12वी वर्गातील विद्यार्थी आणि अलीकडील पदवीधरांना होऊ शकतो.
अभिनयाच्या पलिकडे जाऊन नेहमीच सोनू अशी अनेक काम करून पुन्हा प्रेक्षकांची मन जिंकत आहे.