आपल्या जगण्याने इतरांना आनंद मिळाला पाहिजे ….. अभिनेता विजय पाटकर

आपल्या जगन्यामुळे इतरांना आनंद मिळाला पाहिजे. ज्यांच्याकडे सर्व काही आहे परंतु ते आनंदाने जगू शकत नाही त्यामुळे जगणे हे सुसह्य बनवता आले पाहिज. आपण 24 तास पैशांसाठी काम करतो पण घरच्यांना किती वेळ देतो हे कधीही आपल्या ध्यानात येत नाही. त्यामुळे धावपळीच्या या जीवनात घरच्यांचा आनंद हिरावून घेवू नका . तुम्हीही आनंदित रहा आणि तुमच्यामुळे इतरांनाही आनंद घेता यायला पाहिजे तेही आनंदी राहिले पाहिजेत असे अभिनेता विजय पाटकर यांनी इंडियन ऑडिट आणि अकाउंट मुंबई येथून सेवानिवृत्त झालेले अधिकारी र्श्री रमेश काळे यांच्या सेवा निवृत्ती समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आपले मत व्यक्त केले. यावेळी मंचावर त्यांच्यासोबत श्री संदेश उपश्याम (सुंदरा मनामध्ये भरली – सज्जनराव ) टी व्ही सिने अभिनेता , समाज कल्याण खात्याचे माजी आयुक्त श्री यशवंतरावजी मोरे , माजी नगर सेवक शैलेश धिवर , समाज सेवक मनोहर काळे हे उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अशोक चाफे यांनी केले . कार्यक्रमाचे सुंदर आयोजन सौ. कविता आर. काळे आणि रोहित काळे यांनी केले होते