Bollywood Newsताज्या घडामोडी

विजय पाटकर यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ जागरूक सभासद यांचे तीव्र आंदोलन

दिनांक : २१ जुलै २०२३ रोजी, प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सभासदांना घेऊन दादासाहेब फाळके चित्रनगरी (फिल्मसिटी ) गोरेगाव पूर्व येथे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ जागरूक सभासद यांचे तीव्र आंदोलन करण्यात आले.

महामंडळ सभासद श्री वासू पाटील ( कला दिग्दर्शक ) हे गेली २५ ते ३० वर्ष चित्रपट सृष्टीत काम करत आहे त्यांना अचानक गेट वर अडवणूक करून चित्रनगरीत जाण्यास मज्जाव करण्यात आला , सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक वासू पाटील यांची प्रसिद्ध अभिनेते श्री अमोल कोल्हे सर यांनी मला बोलावले आहे असे सांगून पण सोडत नव्हते याला कोणती दादागिरी हुकूमशाही म्हणायची ,असे प्रश्न वासू पाटील विचारत होते. आज ही घटना एका सभासद वर घडली आहे उद्या असेच चालू राहिले तर महाराष्ट्रात मराठी माणूस आणि मराठी माणसाला काम करायला घडवणारे हे कोण ? कोण आहरे यांचा हुकूमशहा..! असे अनेक प्रश्न सभासद आज चित्रनगरी गेट वर आल्यावर विचारत होते…!

श्री विजय भा. भालेराव व्यवस्थापक ( कल्लागारे ) महाराष्ट्र चित्रपट ,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित ( महाराष्ट्र शासनाचा उपक्रम ) दादासाहेब फाळके चित्रनगरी, यांना याबाबत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ जागरूक सभासदांच्या वतीने एक निवेदन प्रसिद्ध अभिनेते / दिग्दर्शक श्री विजय पाटकर , दिग्दर्शक श्री विजय राणे, संकलक श्री यश सुर्वे , दिग्दर्शक श्री चंद्रशेखर सांडवे, दिग्दर्शक श्री आर्यन देसाई, वेस्टर्न इंडिया प्रोड्युसर असोशियन चे सर चिटणीस श्री दिलीप दळवी ,दिग्दर्शक दिपक कदम, दिग्दर्शक विनय गिरकर, अभिनेत्री सिद्धी कामत, दिग्दर्शक शिरीष राणे , कार्यकारी निर्माते श्री प्रमोद मोहिते, दिग्दर्शक श्री विनोद डावरे ,अभिनेते श्री देवेंद्र मोरे, कार्यकारी निर्माता / अभिनेता श्री गणेश तळेकर यांच्या तर्फे देण्यात आले*, *सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक वासू पाटील यांना चित्र महर्षी दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव च्या प्रवेश द्वाराजवळ त्यांना प्रवेश नाकारला व त्यांना अपमाणांस्पद वागणूक दिली गेली , त्यावर कार्यवाही करावी अशी मागणी देखील करण्यात आली तसेच यापुढे कुठल्याही मराठी कलाकाराला अथवा तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांना अश्या पद्धतीने अडवू नये अशी सूचना सिक्युरिटी गार्ड ना करण्यात येईल असे ही विजय भा. भालेराव म्हणालेत.आणि या झालेल्या प्रसंगाची दिलगिरी व्यक्त केली आणि असा प्रकार परत घडू नये म्हणून चित्रनगरी फिल्मसिटी चे संचालक MD श्री अविनाश ढाकणे साहेब यांना सर्व घडलेली घटना सांगून यावर योग्य कारवाई करावी असे सांगणार म्हणालेत…!

त्याप्रसंगी २०० सभासद यांनी हजेरी लावली होती त्यातील अभिनेता सचिन घाणेकर , अभिनेता घनश्याम गोवेकर, अभिनेता सागर मयेकर, अभिनेते प्रवीण मोहिते, अभिनेता हरी जनार्दन सोनवडेकर , दिग्दर्शक प्रफ्फुल ओमकार, अभिनेता विनायक शानबाग , अभिनेता तुषार खेडेकर, अभिनेता नितीन पाटील ,निर्मिती व्यवस्थापक यशवंत कुलकर्णी, दिग्दर्शक / निर्माता विजय निकम व अन्य सभासद हे हजर होते…!

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये