राजकुमार राव इको-फ्रेंडली गणपती ने साजरा करणार गणेशोत्सव !
अवघ्या काही दिवसांवर गणेश चतुर्थी आली असून संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात हा सण साजरा होणार आहे. सगळ्यांचा उत्साह आता जोरदार वाढला असून यात बॉलीवूड चा अभिनेता राजकुमार राव देखील मागे नाही तो दरवर्षी पर्यावरणपूरक दृष्टीकोनाचा विचार करून हा सण खास पद्धतीने साजरा करतोय. टिकाऊ साहित्य वापरून गणपतीच्या मूर्ती तयार करून तो हा सण साजरा करणार असल्याचं समजतंय या मधून त्यांच्या पर्यावरणाशी असलेली बांधिलकी देखील दिसून येते.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आपला दृष्टिकोन मांडला ” मी दरवर्षी स्वतःच्या हाताने गव्हाच्या पिठाने गणपतीची मूर्ती बनवतो. खूप मजा येते. मी राजमा बीन्स वापरून डोळे बनवतो आणि मसूर आणि इतर डाळी वापरून दागिने बनवतो. मग मी त्यांना हळदीचा वापर करून रंग देतो आणि हे करण्यात एक वेगळ सुख आहे”
बायोडिग्रेडेबल मटेरियल आणि नैसर्गिक रंग वापरून राव अनोख्या पद्धतीने हा उत्सव पर्यावरण पूरक साजरा करतो.
राजकुमार राव यांचे पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्ती बनवण्याचे समर्पण ही सगळ्यांना एक प्रेरणा देऊन जाणार आहे.