शिक्षक दिनानिमित्त अभिनेत्री नर्गिस फाखरी ने मानले तिच्या खास व्यक्तीचे आभार !
शिक्षक दिन साजरा करत असताना अभिनेत्री नर्गिस फाखरी तिच्या आयुष्यातल्या खास लोकांचे आभार मानते आहे. आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर कोणी ना कोणी आपल्याला शिकवत असताना नर्गिस तिला प्रेरणा देणाऱ्या लोकांचे आभार मानते आहे. नर्गिसने तिला आयुष्यात प्रेरणा देणाऱ्या लोकांबद्दल सांगते की त्यांनी तिला घडवल आहे.
नर्गिस म्हणते “जे लोक जीवनातील आव्हानांना तोंड देत पुढे सरकत राहतात, स्वतःचे सर्वोत्तम बनण्यासाठी धडपडतात, दयाळूपणा दाखवतात आणि इतरांना मदतीचा हात पुढे करतात तेच माझे खरे प्रेरणास्रोत आणि जीवनाचे खरे शिक्षक आहेत.”
अशा जगात जिथे स्पॉटलाइट बर्याचदा ग्लिट्ज आणि ग्लॅमरवर चमकते, नर्गिस फाखरीचा प्रेरणांबद्दलचा दृष्टीकोन हा नक्कीच कमालीचा आहे. तिला तिचे गुरू केवळ मनोरंजन उद्योगातील लोकांमध्येच सापडत नाहीत तर ज्यांनी जीवनात तिला प्रत्येक क्षणी मदत केली.
या शिक्षक दिनी आपण केवळ पारंपारिक शिक्षकांचाच नव्हे तर आपल्यातील सर्वोत्कृष्ट माणूस बनण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या उल्लेखनीय व्यक्तींचाही सन्मान करू या !