ग्रीन बेंचमार्क सेट करत राजकुमार राव साजरा करणार इको-कॉन्शियस गणपती बाप्पा …
राजकुमार राव हा त्याच्या प्रतिभावान अभिनयासाठी ओळखला तर जातो पान तो एक पर्यावरण प्रेमी देखील आहे. घरोघरी गणपती बाप्पाच आगमन होत असताना राजकुमार दरवर्षी स्वतःच्या हाताने बाप्पा साकारतो. हा गणेशोत्सव त्याच्या साठी खास आहे कारण तो इको फ्रेंडली बाप्पा दरवर्षी आपल्या घरी घेऊन येतो. अभिनयाच्या सोबतीने सामाजिक पर्यावरण पूरक गोष्टीने उत्सव साजरा करताना त्याला नेहमीच आनंद होतो. सणासुदीची तयारी करत असताना राजकुमार राव गणेश चतुर्थी एकदम निसर्गाची काळजी घेऊन साजरी करणार आहे.
राजकुमार राव यांच्या गणपती ची खासियत म्हणजे दरवर्षी तो प्राथमिक साहित्य म्हणून गव्हाचा वापर करून स्वतःच्या हातांनी गणपतीची मूर्ती बनवण्याची परंपरा पुढे नेतो. बारीकसारीक तपशिलांसाठी राजकुमार राव भावपूर्ण डोळे आणि डाळ (मसूर) सुशोभित करण्यासाठी किडनी बीन्स वापरून बाप्पाला एकदम खास करतो. मूर्तीला रंग देण्यासाठीही नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक साहित्य वापरण्याची त्याची जाणीवपूर्वक निवड ही त्याच्या उत्सवात वेगळीच जादू निर्माण करते. ठरते. मूर्तीला सुशोभित करण्यासाठी तो हळदीचा वापर करतो आणि बाप्पाच रंगकाम करतो.
राजकुमार राव गणेश चतुर्थी इको-फ्रेंडली पद्धतीने साजरी करण्यासाठी सज्ज झाला आहे.