सोनू सूद भारतीय क्रिएटिव्ह युनिटीसोबत ‘कला शक्ती 2023-24’ करणार लाँच
अभिनेता सोनू सूदच्या सूद चॅरिटी फाऊंडेशन सोबतीने भारतीय क्रिएटिव्ह युनिटी (ICU) सह “
कला शक्ती 2023-24 ” लाँच करण्याची घोषणा केली आहे. जो कला आणि सर्जनशील कला शिक्षणाच्या जगात क्रांती घडवून आणणारा एक अनोखा अनुभव असणार आहे.
या अनोख्या उपक्रमाचा उद्देश कलाकारांना आणि सर्जनशील कलाकृती असलेल्या व्यक्तींना सशक्त करणे आणि त्यांना कला शाखेतील सर्वसमावेशक डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी विनामूल्य प्रवेश प्रदान करणे आहे. कला शक्ती 2023-24 कला शिक्षणाचे लोकशाहीकरण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलणार आहे.
सूद चॅरिटी फाऊंडेशन आणि ICU मधील भागीदारी ही नक्कीच उत्सुकता असणारी आहे. कला शक्ती 2023-24 हे सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी आणि महत्त्वाकांक्षी कलाकारांसाठी उज्ज्वल भविष्य सक्षम करण्याच्या दिशेने एक अग्रगण्य पाऊल आहे.