Bollywood NewsEntertainment
हर्षवर्धन कपूरच्या ” थार” ने गुगलच्या ‘व्हॉट टू वॉच’ यादीत अव्वल स्थान पटकावले ..
रिलीजच्या पंधरा महिन्यांनंतरही, हर्षवर्धन कपूरच्या ” थार ” ने Google वर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या शीर्ष 5 पाश्चात्य चित्रपटांमध्ये स्थान कायम राखले आहे. या चित्रपटातून निर्माता म्हणून हर्षचे पदार्पण झालं आणि समीक्षक आणि प्रेक्षक या दोघांकडून सातत्याने त्याच कौतुक झाल ! शिवाय 13 सप्टेंबर 2023 पर्यंत what to watch या यादीत थार टॉप 5 मध्ये आला.
हर्षवर्धन कपूरने निर्विवादपणे “भावेश जोशी सुपर हिरो” आणि ” थार “
सारख्या चित्रपटांमध्ये त्याच्या आकर्षक भूमिकांद्वारे ठसा उमटवून एक प्रखर अभिनेता म्हणून आपली प्रतिष्ठा मजबूत केली आहे.
सध्या कपूर त्याच्या आगामी चित्रपटासाठी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते अभिनव बिंद्राच्या भूमिकेत पाऊल टाकत एक महत्त्वपूर्ण प्रयत्न करत आहे.