YRF ने टायगर 3 मधील सलमान खान आणि कतरिना कैफ वर चित्रित “लेके प्रभु का नाम” या पहिल्या गाण्याचा धमाकेदार टीझर ड्रॉप केला.!

सलमान खान आणि कतरिना कैफ हे भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील सर्वकालीन सर्वात मोठे ऑन-स्क्रीन जोडपे आहेत. त्यांनी ऐतिहासिक ब्लॉकबस्टर आणि जनरेशन टू जनरेशन चालणारे चार्टबस्टर दिले आहेत. आता ते पुन्हा आदित्य चोप्राच्या टायगर 3 मध्ये त्यांच्या प्रतिष्ठित पात्रांची, सुपर-एजंट टायगर आणि झोयाची वायआरएफ स्पाई युनिवर्स मध्ये पुन्हा दिसणार आहेत त्या मुळे इंटरनेट वर एकच धुमाकूळ आहे.
टायगर 3 च्या पहिल्या गाण्याच्या लेके प्रभु का नाम च्या फर्स्ट लूकने काल इंटरनेटवर धुमाकूळ घातला! फोटो मध्ये सलमान आणि कतरिना तुर्कीतील कॅपाडोशिया येथे एका सुंदर ठिकाणी गाण्यावर थिरकताना दिसले. आज, YRF ने सोमवार, २३ ऑक्टोबर रोजी रिलीज होणाऱ्या गाण्याच्या टीझरद्वारे लोकांना चकित करून लेके प्रभु का नामची अपेक्षा वाढवली आहे!
प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि अरिजित सिंग आणि निकिता गांधी यांनी गायलेल्या वाईबी डान्स ट्रॅकमध्ये सलमान आणि कतरिनाची अविश्वसनीय केमिस्ट्री दिसते! दोन्ही सुपरस्टार या गाण्यात अतिशय सुंदर दिसत आहेत जे या उत्सवाच्या हंगामात नक्कीच पार्टी अँथम बनेल!
मनीश शर्मा दिग्दर्शित, टायगर 3 यावर्षी दिवाळी, 12 नोव्हेंबर, रविवारी रिलीज होणार आहे!