राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट संगीत संयोजक विजेते रॉकस्टार डीएसपी ने मुंबईत केलं खास सेलिब्रेशन…
रॉकस्टार डीएसपी ला नुकताच “पुष्पा: द राइज” या चित्रपटातील उत्कृष्ट कामासाठी सर्वोत्कृष्ट संगीताचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि हा पुरस्कार केवळ त्याच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पाच नाही तर संगीत उद्योगातील त्याच्या उल्लेखनीय कामाचं कौतुक होत.
डाउन-टू-अर्थ व्यक्तिमत्त्वासाठी प्रसिद्ध असलेल्या रॉकस्टार डीएसपीने त्याचा हा पुरस्कार चाहत्यां सह आणि पापाराझी सोबत साजरा केला.” पुष्पा: द राइज” साठी रॉकस्टार डीएसपीचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्याने चाहत्यांची आणि समीक्षकांची सारखीच प्रशंसा झाली आहे आणि पापाराझींना त्याच्या या पुरस्काराचे कौतुक केलं.
रॉकस्टार डीएसपीचा विजय केवळ त्याची अविश्वसनीय प्रतिभाच दाखवत नाही तर चाहते आणि माध्यमांसोबतचा त्याचा खरा संबंध देखील दर्शवतो. त्यांचा राष्ट्रीय पुरस्कार हा संगीत उद्योगासाठी अभिमानास्पद आहे. ” पुष्पा 2: द रुल,” “कंगुवा,” आणि विकास बहल दिग्दर्शित अजय देवगण आणि आर. माधवन यांचा समावेश असलेला शीर्षकहीन चित्रपट यांसारख्या आगामी प्रकल्पांसह प्रेक्षकांना भुरळ घालण्यास तयार आहे.