Bollywood NewsEntertainment

राजकुमार राव ने पटकावला ओटीटी परफॉर्मर ऑफ द इयर पुरस्कार 

अभिनेता राजकुमार राव हा एक अष्टपैलुत्व असलेला अभिनेता म्हणून ओळखला तर जातोच आणि कथाकथनाच्या सीमा ओलांडण्याच्या त्याची सवय ही कायम त्याला विविध भूमिका करायला लावते. अलीकडेच या राष्ट्रीय आयकॉनने “गन्स अँड गुलाब्स” या वेब सिरीज आणि “मोनिका, ओ माय डार्लिंग” या चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल ओटीटी परफॉर्मर ऑफ द इयर हा पुरस्कार पटकावला. 

वैविध्यपूर्ण भूमिकांमध्ये स्वतःला झोकून देण्याची राजकुमार रावची क्षमता ही कायम उल्लेखनीय ठरली. “गन्स अँड गुलाब्स” मधील एक करिश्माई मेकॅनिकमधून गुंड बनलेल्या पाना टिपूची भूमिका आणि “मोनिका ओ माय डार्लिंग” मधील रोबोटिक्स तज्ञ म्हणून त्याच्या भूमिकेची जोरदार प्रशंसा होऊन याला खूप प्रेम मिळालं. 

“विकी विद्या का वो वाला व्हिडिओ,” “स्त्री 2,” आणि “SRI” चा समावेश असलेल्या रोमांचक आगामी प्रोजेक्ट्ससह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी तो सज्ज होत आहे.

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये