Bollywood NewsEntertainment

” गणपथ ” पलिकडचा टायगर श्रॉफ….

" द टायगर इफेक्ट " बॉक्स ऑफिसवर गणपथ पलिकडे जाणारा टायगर श्रॉफ चा प्रवास..

बॉलीवूडच्या जगात प्रत्येक फ्रायडे ला चित्रपटाच आणि कलाकारच भवितव्य ठरत. बॉक्स ऑफिसच्या इन्कम वर प्रत्येक कलाकार आणि चित्रपट यांची प्रतिमा ठरते. जरी टायगर श्रॉफचा त्याचा अलीकडील चित्रपट “गणपथ” ने फार अपेक्षित कमाई केली नसली तरीही त्याची कलाकारी कारकिर्दी ही बॉक्स ऑफिस पलिकडे आहे.

” हीरोपंती ” सारख्या चित्रपटाने ज्याने बॉक्स ऑफिसवर प्रभावी 6.8 कोटी कमावले आणि हा त्याचा धमाकेदार पहिला चित्रपट होता ज्याने इंडस्ट्रीमध्ये त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली. ‘बागी’, ‘बागी 2’, आणि अॅक्शन-पॅक्ड ‘वॉर’ यांसारख्या त्यानंतरच्या चित्रपटांनी त्याच्या कारकिर्दीचा काळ हा उल्लेनीय ठरला. सुरुवातीच्या आकड्यांना मागे टाकून आणि थिएटरमध्ये गर्दी खेचून आणण्याची त्याची क्षमता ही सगळ्यांनी पाहिली.

बॉक्स ऑफिस ची संख्या कायम बोलली जाते आणि म्हणून ” बागी 2′ ने ‘बागी’च्या कलेक्शनपेक्षा दुप्पट कलेक्शन केलं आहे ज्याने २५ कोटी चा दमदार गल्ला कमावला. ” वॉर “
ज्यामध्ये त्याने हृतिक रोशनसोबत स्क्रीन शेअर केली होती आणि त्याने बॉक्स ऑफिसवर तब्बल 53 कोटींची कमाई केली आणि त्याच्या कारकिर्दीत एक नवीन उच्चांक गाठला. कोविड सारख्या आव्हानात्मक काळातही “बागी 3 “
ने सुरुवातीच्या काळात 17 कोटींची दमदार कमाई केली.

अलीकडेच ‘गणपथ’ ला 4 कोटींचा ओपनिंग मिळाली आणि चांगला प्रतिसाद मिळून देखील बॉलिवुड उद्योगातील एका उल्लेखनीय सूत्राने सांगितले की, टायगरमध्ये उल्लेखनीय सातत्य आहे आणि त्याची सुरुवात त्याच्या पिढीतील कलाकारांसाठी अतुलनीय आहे. हे आकडे त्याचे बॉक्स ऑफिस ड्रॉ आणि जनतेसाठी पोस्टर बॉय म्हणून त्याची प्रतिमा निर्माण करते.

जगन शक्ती दिग्दर्शित “बडे मियाँ छोटे मियाँ,” “हिरो नंबर 1,” मध्ये अक्षय कुमार सोबत अभिनय करत सिद्धार्थ आनंद निर्मित रॅम्बो आणि अलीकडेच रोहित शेट्टी यांच्यासाठी हैदराबादमध्ये काही नेत्रदीपक अॅक्शन पॅक साठी टायगर त्याच्या आगामी प्रोजेक्ट साठी सज्ज होत असून ” सिंघम अगेन ” मध्ये तो दिसणार आहे.

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये