EntertainmentSerial

मराठी चित्रपट ‘सलमान सोसायटी’ च अभ्यासू कीडा सॉन्ग आउट, उपेंद्र लिमये दिसणार ख़ास भूमिकेत…

‘सलमान सोसायटी’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील दूसर सॉन्ग आज लॉन्च करण्यात आले असून अभ्यासू कीडा असे या गाण्याचे बोल असून उपेंद्र लिमये, विनायक पोतदार आणि नितीन एम यांच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले.

‘सलमान सोसायटी’ चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश पवार व निर्मिती रेखा सुरेंद्र जगताप , शांताराम खंडू भोंडवे व वैशाली सुरेश चव्हाण प्राजक्ता एण्टरप्राईजेसच्या बॅनर अंतर्गत केली आहे .
अवंतिका दत्तात्रय पाटील आणि विडियो पॅलेस प्रस्तुत ‘सलमान सोसायटी’ हा चित्रपट शिक्षणावर भाष्य करतो. भारत देश साक्षर होईल तेव्हा भारताचा विकास होईल या टॅगलाईनवर आधारीत आहे. ‘अभ्यासू कीडा’ हे गाणे श्रेयस आंगणेने संगीतबद्ध केले आहे आणि गायक सुहास सावंत ने गायले आहे. अमित बाईंग ने कोरियोग्राफ केले आहे तसेच चित्रपटा चे डीओपी फारुक खान आहेत.

दिग्दर्शक कैलाश पवार म्हणतात “हे गाणे खूपच एंटरटेनिंग असून प्रत्येक शाळेत वाजेल अशी अपेक्षा आहे , उपेंद्र सरांनी खूपच सुंदर परफॉर्म केले आहे त्यामुळे हे गाणे आणखीनच सुंदर होते , गाण्याची कोरिओग्राफी उत्तम झालेली आहे आणि म्यूजिक ही दमदार आहे. खुप काळा नंतर बच्चे कंपनी हे गाण एन्जॉय तर करतील पण पालक ही पसंत करतील ह्याची खात्री आहे.

या चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वाना प्रभावित करणारा गौरव मोरे एका वेगळ्या पण महत्वपूर्ण भूमिकेत दिसेल. तसेच पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार ही बच्चे कंपनी मुख्य भूमिकेत असणार आहेत. बाल कलाकार पुष्करने या आधी ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘बाजी’, ‘रांजण’, ‘चि .व चि .सौ. का’, ‘फिरकी’ आणि ‘टी. टी. एम. एम’ झोंबीवली चित्रपटात अभिनय केला आहे तर शुभम मोरेने हिंदी चित्रपट ‘रईस’मध्ये बालपणीच्या शाहरुख़ खानची भूमिका बजावली. तसेच ‘हाफ टिकिट’, ‘फास्टर फेणे’ जर्नी सारखे उत्तम मराठी चित्रपट केलेत तर बाल कलाकार विनायक पोतदार याने ‘हाफ टिकिट’, ‘ताजमहल’ आणि ‘येरे येरे पावसा, माउली’मध्ये भूमिका केल्या आहेत.

चित्रपटा मध्ये उपेंद्र लिमये पहुण्या भूमिकेत आहे. तसेच चित्रपटा मध्ये देवकी भोंडवे, वनिता खरात, नम्रता संभेराव, कुणाल मेश्राम, शेषपाल गणवीर, नरेंद्र केरेकर, तेजस बने आदि कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

”अभ्यासू कीडा ‘ हे गाणे रसिकांना तसेच बच्चे कंपनी ला भुरळ पाडेल हे नक्की आहे. आता उत्सुकता आहे चित्रपटाच्या ट्रेलर ची जो लवकरच प्रदर्शित होईल .

प्रजक्ता एंटरप्राइजेस निर्मित , अवंतिका दत्तात्रय पाटील आणि विडियो पॅलेस प्रस्तुत सलमान सोसाइटी १७ नोव्हेंबर २०२३ ला सर्व चित्रपटग्रहात प्रदर्शित होत असुन म्यूजिक वीडियो पॅलेस वर उपलब्ध आहे.

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये