EntertainmentSerial
हार्दिक जोशी दिसणार ‘जाऊ बाई गावात’ ह्या नव्या कार्यक्रमात !

झी मराठीवर काही दिवसांपूर्वी एक टिझर रिलीझ झाला, *’करणार तेव्हा कळणार आता मज्जा येणार’* आणि चर्चा सुरु झाली हा कार्यक्रम नक्की काय आहे रिऍलिटी शो आहे की नवी मालिका. आता ह्या कार्यक्रमाचा आणखी एक नवीन प्रोमो प्रदर्शित झालाय ज्यात आता *’हार्दिक जोशी’* म्हणताना दिसतोय करणार ‘तेव्हा कळणार आता मज्जा येणार’ नेमकं काय कळणार आणि काय मज्जा येणार हे प्रेक्षकांना हळू हळू उलगडत जाईल. अशी एक अफलातून संकल्पना जिचा प्रेक्षकांनी विचार सुद्धा केला नसेल आता तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या लाडक्या झी मराठीवर.
दिवाळीचा खुमासदार फराळाची चव जिभेवर रेंगाळत असतांना, प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आणि मनोरंजनाची रंगतदार आतिषबाजी करणारा हा कार्यक्रम म्हणजे ‘जाऊ बाई गावात’ आपल्या भेटीस येत आहे लवकरच आपल्या झी मराठीवर.*