Bollywood NewsEntertainment

सनी लिओनी ची वाराणसी अध्यात्मिक ट्रीप

अभिनेत्री सनी लिओनी सध्या गायक अभिषेक सिंगसह तिच्या अलीकडील डान्स व्हिडिओच्या प्रमोशन साठी अनेक ठिकाणी फिरत असताना सनी चक्क वाराणसी ला जाऊन पोहचली आहे. वाराणसी सारख्या धार्मिक शहराला तिने भेट दिली आणि सोशल मीडिया वर खास पोस्ट शेयर केली आहे. केनेडी अभिनेत्रीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केल आणि ती या दौऱ्या दरम्यान सुंदर दिसत होती. गुलाबी सलवार सूटमध्ये ती अगदीच पारंपारिक भारतीय पोशाखात सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. गंगा आरतीचा अध्यात्मिक मूड तिच्या पोशाखाच्या चमकदार रंगाने रंगून गेला होता.

पवित्र नदीच्या काठावरील धार्मिक समारंभात सनी च्या उपस्थितीने सगळ्यांना मोहित केलं. सनी ने हा सगळा अनुभव तिच्या सोशल मीडिया वर शेयर केला आहे आणि त्याला साजेस कॅपशन दिलं आहे

“वाराणसीमधला गंगा आरती पाहण्याचा सर्वात आश्चर्यकारक अनुभव. धन्यवाद!! @abhishek_as_it_is & @tseries.official”

https://www.instagram.com/tv/CztWXxwKfeN/?igshid=NjZiM2M3MzIxNA==

गंगा आरतीमध्ये परंपरांसोबत आधुनिकतेचे मिश्रण केल्याबद्दल चाहत्यांनी सनी लिओनीचे कौतुक केले. व्यावसायिक आघाडीवर सनी ‘ग्लॅम फेम’ वर जज म्हणून पदार्पण करण्याच्या तयारीत आहे जो लवकरच जिओ सिनेमावर प्रीमियर होणार आहे. अनुराग कश्यपचा निओ-नॉयर थ्रिलर ‘केनेडी सोबतीला राहुल भट्ट अभिनीत, आणि तिचे तमिळ पदार्पण असलेला ‘कोटेशन गँग ‘ हा चित्रपट येत आहे.

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये