EntertainmentSerial

ओंकार भोजनेची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा धमाल!

अगं अगं आई.. खास शैलीतले हे शब्द आपल्या कानावर पडता क्षणी ओंकार भोजने डोळ्यांसमोर उभा राहतो. पुन्हा एकदा तोच आवाज.. तेच पात्र आपल्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळणार आहे म्हटलं तर… होय होय, अगदी खरं… जे ऐकलं ते अगदी खरंय… सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा मंच पुन्हा एकदा विनोदाच्या आतशबाजीने दणाणून सोडायला ओंकार भोजने पुन्हा एकदा या मंचावर पाहता येणार आहे. ओंकारने उडवून दिलेले हास्याचे बार बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा पाहा, येत्या शनि. १८ आणि रवि. १९ नोव्हेंबरला. पाहा, सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’.

संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी एकमेव हास्यमालिका म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’! टेंशन्स आणि फ्रस्ट्रेशन्स यांना मात मात देत, यातील अवली मंडळी प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आलेली आहेत. सोनी मराठीने चालवलेला हा स्तुत्य कार्यक्रम अनेकांना काही घटका का होईन खळखळून हसण्याची संधी देत असतो आणि त्यामुळेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ह्या कार्यक्रमाची जादू आजही, अनेक सिझन्सनंतरही सर्वत्र पाहायला मिळते आहे. त्यातले कलाकार हे आपले इतके जवळचे झाले आहेत की, प्रेक्षक त्यांना त्यांची थेट पसंती कळवतात. त्यांच्यावरली प्रेम-नाराजी सोशल मिडियावर व्यक्त करत असतात. ओंकार भोजनेही असाच एक अवलिया आहे जो रसिकांच्या मनावर आपल्या अभिनयाने राज्य करतोय आणि तो हास्यजत्रेत पुन्हापुन्हा दिसावा यासाठी प्रेक्षकही आपली मागणी वारंवार करताना दिसतात. पण ओंकार वारंवार महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात दिसणार का हे अजून अनिश्चित आहे.

ओंकार ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत एका खास निमित्ताने येतोय. आता हे खास निमित्त काय आहे, हे पाहण्यासाठी मात्र तुम्हांला शनि. १८ आणि रवि. १९ नोव्हेंबरला सोनी मराठी वाहिनीवर येऊनच बघावं लागेल. ह्या नामी संधीचा लाभ घ्या आणि पाहायला विसरू नका ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि ओंकार भोजनेची कॉमेडी जुगलबंदी.

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये