बिग बॉस १७ मध्ये अंकिता लोखंडेने जिंकली अनेक सेलिब्रिटी ची मन
अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांनी बिग बॉस 17 च्या घरात प्रवेश केल्यापासून त्यांनी देशभरातील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे दोघे बिग बॉस च्या घरात लक्षवेधी जोडी ठरले आहेत. या जोडप्याला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला आहे विशेषत: सह-सेलिब्रेटींकडून ज्यांनी त्यांची प्रशंसा केली आहे.
अंकिता लोखंडेला विविध क्षेत्रांतील सेलिब्रिटींनी अनेक मुलाखतींद्वारे मनापासून पाठिंबा व्यक्त केला आहे. राखी सावंत, हिना खान, असीस कौर, श्रद्धा आर्य, आशिता धवन आणि शालिन भानोत या सर्वांनी अंकिता च कौतुक केलं आहे. ज्यामुळे ती बिग बॉसच्या घरात आवडती जोडी बनली आहे.
बिग बॉस 17 च्या घरातील अंकिता लोखंडेचा प्रवास मनोरंजनाच्या पलिकडचा आहे.अंकिता आणि विकी चे चाहते आणि सेलिब्रिटी दोघांच्याही हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे.
https://www.instagram.com/reel/C0dvw7xvzZI/?igshid=MzRlODBiNWFlZA==