Entertainmentताज्या घडामोडी

अभिनेत्री मीरा जोशीचा सस्पेन्स ड्रामा “ऑरेज लिली” जिओ ओटीटीवर….

येत्या १६ डिसेंबर २०२३ ला जीओ सिनेमा या ओटीटी चेनलवर ‘ऑरेंज लिली’ ही हिंदी फिल्म प्रदर्शित होणार आहे. सस्पेन्स ड्रामा असलेल्या या फिल्मचं लेखन आणि दिग्दर्शन समीर वंजारी यांनी केलं आहे.
अभिनेत्री मीरा जोशी यामध्ये आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. एका सायको मुलीचं पात्र मीराने साकारलं आहे. तिच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा हे पात्र अगदी हटके असल्याचे ती सांगते.

फार्महाउसमध्ये एकत्र वेळ घालवण्यासाठी आलेल्या जोडप्पामध्ये भांडण होतं, आणि नंतर मुलगी अचानक नाहीशी होते. ती रागाऊन तिथून निघून गेली का? का तिच्यासोबत काही घातपात झालाय? याच्या भवती ही कथा फिरत राहते. अगदी शेवटपर्यंत त्या मुलीविषयी म्हणजे ‘लिली’बद्दल गूढ कायम राहतं. या सिनेमात वेगवेगळे ट्विस्ट् आपल्याला पाहायला मिळणार आहे.  तसेच अभिनेत्री मीरा जोशी एक हटके भुमिकेत दिसणार आहे.तर हा सस्पेन्स थ्रिलर ड्रामा पाहायला विसरू नका. 

 

 

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये