Bollywood NewsEntertainment

‘मै भी सोनू सूद” या उदात्त मोहिमे ने मुंबईत गाठली

चाहत्यांच्या प्रेम आणि परोपकारा सामाजिक सेवक म्हणूनसोनू सूद ओळखला जातो. त्याच्या समर्थकांनी 4 नोव्हेंबर 2023 रोजी “मै भी सोनू सूद” हि देशव्यापी मोहिम सुरू केली. या मोहिमेला नवी दिल्लीहून सुरुवात होऊन आता शेवटी मुंबई पर्यंत ही मोहीम येऊन पोहोचली आहे. सामाजिक बांधिलकी जपत एकता आणि गरिबांना मदत करण्यासाठी संपूर्ण भारतातील लोकांना एकत्र जोडणे हा या अभिनव उपक्रमाचा उद्देश आहे. ही मोहीम उत्तरेकडील गाझियाबाद, डेहराडून, शिमला, अमृतसर, मोगा यासारख्या मोठ्या शहरातून त्याच्या सोबतीने लहान शहरे आणि महानगरांसह 100 हून अधिक शहरे पार करून पश्चिमेकडे जैसलमेर, बामेर आणि अहमदाबाद यांसारख्या शहरांमध्ये पुढे गेली आणि आता मुंबईत तिचा शेवट झाला आहे.

सोनू सूदला त्याच्या चाहत्यांकडून हे खास गिफ्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. संपूर्ण मोहीम “S” अक्षरावर केंद्रित होती. हा प्रवास इंदूर आणि भोपाळ यांसारख्या मध्यवर्ती शहरांमधून, पूर्वेकडील, बरेली, बिसापूर, पौनी आणि नागपूर सारख्या शहरांमध्ये चालू राहिला आणि मुंबईला पोहोचण्यापूर्वी कल्लेश्वरम, तिरुपती आणि विजयवाडा देखील त्यांनी कव्हर केला. मंगळुरू वाटेत पश्चिमेला बेंगळुरू आणि पणजी सुमारे 40 दिवसांत 27 प्रमुख थांब्यांसह आणि 154 तासांत 6645 किलोमीटर अंतर कापून संपवून दुब्बा थांडा येथील सोनू सूद मंदिरात रात्रभर थांबून हा प्रवास सुरू होता.

सोनू हा अभिनयाच्या पलिकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपणारा अभिनेता आहे. शिक्षण आणि वैद्यकीय गरजांमध्ये योगदान देऊन समाजातील सर्वात असुरक्षित व्यक्तींना मदतीचा हात पुढे करून ही मोहीम उत्तम काम करत आहे.

“मै भी सोनू सूद” ही केवळ एक मोहीम नव्हती तर ती मानवी जीवनात बदल घडवून आणून सगळ्यांना एकत्रित घेऊन येऊन काम करण्याची अनोखी ताकद होती.

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये