EntertainmentSerial

एका सूत्रसंचालकाची भूमिका निभावताना मी कुठे कमी तर पडणार नाही ना याची सतत मला काळजी घ्यावी लागते.- हार्दिक जोशी

 

१. ‘जाऊ बाई गावात’ ह्या कार्यक्रमासाठी पहिल्यांदा कॉल आला तेव्हा काय प्रतिक्रिया होती?

माझी पहिली प्रतिक्रिया अशी होती की सूत्रसंचालन आणि मी? पण नेहमी आव्हानात्मक गोष्टी करायची आवड असल्यामुळे मी ह्या संधीचा विचार केला, थोडा वेळ घेतला, पण झी मराठीचा माझ्यावरती जो विश्वास आहे, जसं आमचं नातं आहे माझ्यासाठी हा निर्णय घेणं त्यांनी सोप्प केलं. मनात थोडीशी धाक धुक ही होती की प्रेक्षक मला ह्या भूमिकेत स्वीकारतील का? पण आम्ही वर्कशॉप सुरु केलं आणि ते माझ्यासाठी खूप उपयुक्त ठरलं. ही संधी सोडायची नव्हती कारण एक कलाकार म्हणून शब्दांचा साठा वाढला पाहिजे असं माझं मत आहे आणि संधीच सोनं करणं आपल्या हातात असतं

२. कधी न पाहिलेली अशी संकल्पना आहे ही, तर त्या बद्दल तुझं काय मत आहे ?

महाराष्ट्रात ही संकल्पना मी पहिल्यांदाच पाहिली आणि मी स्वतःला खूप नशीबवान मानतो की मला ह्या वेगळ्या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक बनायची संधी मिळाली. अभिमान आहे मला आपल्या मातीशी जोडलेलं कार्य मी करत आहे. रोज नवीन गोष्टी मला ही शिकायला मिळतात. आपल्या संस्कृतीशी जोडलेल्या गोष्टी लोकांपर्यंत ह्या कार्यक्रमाच्या निमिताने पोहचत आहेत, ह्याऊन उत्तम अजून काय असू शकतं. अप्रतिम संकल्पना आहे ‘जाऊ बाई गावातची’

३. इतके वेगळ्या विचारांच्या मुलींसोबत कार्य करणे त्यांना गावच्या मातीचे आणि संस्कृतीचे महत्त्व समजवणे तुझ्यासाठी किती आव्हानात्मक आहे?

ह्या कार्यक्रमाचे स्पर्धक वेगळ्या सामाजिक पार्श्वभूमीमधून आल्या आहेत त्यांनी आपलं आयुष्य खूप ऐशोआरामात जगलं आहे, त्यांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. पण जे चूक आहे ते चूक आहे आणि तिथे बोललं गेलंच पाहिजे पाहिजे आणि मी तेच करत आहे. जिथे आपल्या परंपरेचा- संस्कृतीचा विषय येतो तिथे त्यांना समजवून देणं एक नागरिक आणि ह्या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक म्हणून माझं कर्तव्य आहे असे मानतो. माझ्या पहिल्या मालिकेत ‘तुझ्यात जीव रंगला’ मध्ये राणादा मुलींपासून पासून लांबच होता आणि इथे मी मुलींबरोबर रोज शूटिंग करत आहे

४. ‘जाऊ बाई गावात’ मध्ये तुझा आवडता स्पर्धक कोण आहे?

सगळेच स्पर्धक हुशार आहेत आणि प्रत्येकाची काहीतरी खासियत आहे, त्याच्याकडे कोणत्या विषयाबद्दल माहिती कमी असेल तर मला असं वाटतं की ती कमी पूर्ण करायला त्यांची मदत केली पाहिजे. या शोच्या माध्यमातून त्यांना काही शिकता येत असेल तर त्याचा मला आनंदच आहे.

५. तू काय अभ्यास केला आहेस ‘जाऊ बाई गावातसाठी’?

झी मराठीने माझ्याकडून ह्या शोची तयारी आधीपासूनच करून घेतली आहे. ५ वर्ष मी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेचं शूट कोल्हापुरात करत होतो. त्यामुळे माझी नाळ या मातीशी जोडली गेली आहे. मुळात माझ्या घरात माझ्यावरती लहानपणा पासून चांगले संस्कार झाले आहेत. बालवाडीत असताना माझ्या कडून मारुती स्तोत्र , राम रक्षा पाठ करून घेतला गेला, ज्या वयात नीट वाचता ही येत नव्हतं तेव्हा आज्जीने आमच्यावर हे संस्कार करायची सुरवात केली होती. आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे तरच आपण येणाऱ्या पिढीला काही शिकवू शकतो. मला वाटतं हे स्पर्धक जेव्हा इथून बाहेर पडतील तेव्हा त्यांच्या ज्ञानाची तिजोरी भरलेली असेल.

६. घरातल्यांचा काय प्रतिसाद होता ?

माझ्यासाठी हा शो माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा आहे . माझी वाहिनी खूप आजारी होती आणि मी ह्या शो मधून आपले पाऊल मागे घेत होतो. पण जेव्हा माझ्या वाहिनीला समजले की मी ‘जाऊ बाई गावातला’ नकार द्यायला जात होतो, तेव्हा हॉस्पिटल मध्ये तिने तिच्या हातात माझा हात घेतला आणि माझ्याकडून वचन घेतले की हा शो तू सोडायचा नाही. कारण तिला माहिती आहे की मी कामातून कधी माघार घेत नाही, तर तिझ म्हणणे होते की जी गोष्ट आज पर्यंत नाही केली ती ह्या पुढे ही करायची नाही. हा शो मी फक्त तिच्यामुळे करतोय आणि योगायोग असा कि ‘जाऊ बाई गावातचा’ पहिला एपिसोड तिच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रसारित झाला. पण मला नेहमी खंत राहील की कार्यक्रमाचा पहिला एपिसोड बघायला ती ह्या दुनियेत नव्हती. मी माझ्या प्रत्येक दिवसाची सुरवात तिला नमस्कार करून करतो.

७. तुझा अनुभव ‘जाऊ बाई गावात’ मध्ये टास्क करण्याचा ?

तुम्ही नुकताच आर्मी स्पेशल भाग पहिला असेल त्यात एक टास्क होता जो स्पर्धकांनी करायच्या आधी मी केला होता त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी. तो आर्मी टास्क करताना माझा हाथ निखळला, तरी पण मी तो टास्क पूर्ण केला. एका सूत्रसंचालकाची भूमिका निभावताना मी कुठे कमी तर पडणार नाही ना याची सतत मला काळजी घ्यावी लागते. इतक्या लोकांचा विश्वास, प्रेम आहे माझ्यावर आणि मी कोणालाच निराश होऊ देणार नाही. मी माझी जबाबदारी पूर्णपणे पडणार.

जाऊ बाई गावात’ सुरु झाल्यापासून सर्वांकडून फक्त आणि फक्त प्रेम आणि प्रोत्साहन मिळतंय, आणि ही फक्त सुरुवात आहे ह्या कार्यक्रमात प्रेक्षकांना खूप काही पाहायला मिळणार आहे, ज्याचा त्यांनी विचारही केला नसेल.

तेव्हा पाहायला नका ‘जाऊ बाई गावात’ सोमवार ते शनिवार रात्री ९:३० वाजता फक्त आपल्या झी मराठी वाहिनीवर.

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये