‘जाऊ बाई गावात मध्ये मुलींसमोर येणार ‘ट्रॅक्टरचा टास्क’
झी मराठीवर ‘जाऊ बाई गावात’ हा शो दिवसेंदिवस रंगत चालला आहे. मजेशीर टास्क पाहताना आणि शहरी मुलींची तारांबळ उडालेली पाहताना सर्वाना नक्कीच मज्जा येत असेल. तुमची उत्सुकता अशीच कायम ठेवण्यासाठी हार्दिक दादा एक नवीन टास्क आला आहे ‘ट्रॅक्टर शर्यत’, ज्या मध्ये गंमत ही आहे की ह्या टास्क मध्ये प्रत्येक टप्प्यावर अडथळे असणार आहेत जे स्पर्धकांना पार करायचे आहेत. जो हे सगळे अडथळे पार पाडणार तोच या टास्कचा विजेता बनणार. हे सर्व होत असताना स्पर्धकांमध्ये टशन होताना दिसत आहे. आता फक्त टास्क मध्ये नाही तर एलिमिनेशन टप्पावर ही जोरदार टशन दिसणार आहे.
काय वाटतंय कोणाच्या प्रवासाला लागेल ब्रेक आणि कोण होईल ह्या टास्कचा विजेता जाणून घ्यायला पहा ‘जाऊ बाई गावातचे’ येणार भाग सोमवार ते शनिवार रात्री ९:३० वाजता फक्त आपल्या झी मराठी वाहिनीवर.