Bollywood NewsEntertainment

“ऑपरेशन व्हॅलेंटाईन” मध्ये रडार ऑफिसर च्या भूमिकेत दिसणार मानुषी छिल्लर

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर सध्या एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे आणि याच कारण देखील तितकच खास असून शक्ती प्रताप सिंग हाडा दिग्दर्शित “ऑपरेशन व्हॅलेंटाईन” या आगामी एअरफोर्स चित्रपटात ती “रडार ऑफिसर” ची महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. नेहमीच अभिनयाच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांना मोहित केलं आणि आता या आगामी चित्रपटात ती ही कमालीची भूमिका साकारण्यासाठी सज्ज होत आहे.

“ऑपरेशन व्हॅलेंटाईन” हा सिनेमा हवाई दलातील महान वीरांना मनापासून केलेला सल्युट आहे. रडार ऑफिसर म्हणून मानुषीची भूमिका बघण उत्कंठावर्धक असणार तर आहे अभिनेत्री म्हणून तिची अष्टपैलुत्व देखील यातून अधोरेखित होणार आहे.

अॅक्शन आणि इमोशन यांचा मिलाफ असलेला हा चित्रपट जगभरा प्रेक्षकां ना आवडेल यात शंका नाही. या प्रकल्पात मानुषी छिल्लरचा सहभाग ही तिची वैविध्यपूर्ण आणि सशक्त भूमिकांबद्दलची वचनबद्धता स्टिरियोटाइप च्या पलिकडची आहे.

“ऑपरेशन व्हॅलेंटाईन” च्या रिलीजची सगळेच वाट बघत आहेत. मानुषी छिल्लरचे रुपेरी पडद्यावर ब्युटी क्वीनमधून अनोखं पदार्पण बघण्याजोग असणार आहे.

व्हॅलेंटाईन डेच्या दोन दिवसांनी म्हणजे १६ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट एकाच वेळी तेलुगू आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये