Bollywood NewsEntertainment

उर्फी जावेदने तिच्या व्हायरल वेट्रेसिंग व्हिडिओमागील सांगितली खास गोष्ट….

मुंबईतील रिस्टोबार द नाइन्स इथला उर्फी जावेद चा वेटर बनल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया वर चांगलाच व्हायरल झाला. ती वेटर का बनली होती हा प्रश्न सगळ्यांना पडला होता पण आज चक्क तिने या व्हिडिओ मागचं खास कारण सांगितलं आहे. वेटर बनून तिने लोकांना प्रेमाने जेवण सर्व्ह केलं लोकासोबत आपुलकीने गप्पा मारल्या आणि त्यांचा हा खास वेळ तिने तिच्या वेटर सर्व्हिस ने स्पेशल केला. वेटर बनल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. आज तिने इंस्टाग्रामवर तिच्या ही खास गोष्ट उघड करताना सांगितलं तिने कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनसाठी निधी उभारण्यासाठी वेट्रेस होण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओला कॅप्शन तिने दिले आहे:

“स्वप्न साकार झालं! कोणतेही काम मोठे किंवा लहान नसते. ते सर्व दृष्टीकोनावर अवलंबून असते. मला एक तास वेट्रेस म्हणून काम करायचं होत आणि कॅन्सर पेशंट एड असोसिएशनमध्ये निधी देण्यासाठी मी ही हक्काची कमाई केली. @cpaaindia
@suved @theninesmumbai यांना हे घडवून आणल्याबद्दल त्यांचे खूप आभार ❤️

https://www.instagram.com/reel/C1Tw3pqIij5/?igsh=MWtxeDMyeDA2aGdxNw==

मीडिया सेन्सेशन आणि फॅशन आयकॉन असलेल्या तिला नोकरीतील आव्हाने समजून घेण्यासाठी वेट्रेस बनायचे होत आणि तिने जेवण करणाऱ्यांनी वेटिंग कर्मचार्‍यांशी उद्धटपणे वागताना पाहिले असले तरी त्या रात्रीचे पाहुणे तिच्याशी आणि हॉटेल मधल्या कर्मचार्‍यांशी खूप छान वागत होते. तिने काही टिप्स घेतल्या ज्या ती आता कर्करोगाच्या रुग्णांना मदत करण्यासाठी देणार आहे.

ट्रेलब्लेझर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उर्फी जावेदचे हे पाऊल अनेकांना प्रेरणा देऊन जाणार आहे. तिला या ख्रिसमसमध्ये काहीतरी अर्थपूर्ण करायचे होत आणि सिक्रेट संता बनून लोकांना मदत करायची होती.

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये