Bollywood NewsEntertainment

गन्स अँड गुलाब्सच्या दुसऱ्या सीझनमध्ये राजकुमार रावने पुन्हा एकदा पान टिपूच्या रुपात अवतरणार

नेटफ्लिक्स इंडिया सोबत चित्रपट निर्माते जोडी राज निदिमोरू आणि कृष्णा डीके दिग्दर्शित आणि राजकुमार राव यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या गन्स अँड गुलाब्स या त्यांच्या प्रचंड यशस्वी गुन्हेगारी वेब सीरिज चा दुसरा सीझन ची घोषणा केली आहे.

https://www.instagram.com/reel/C1YsqUpSKP8/?igsh=MTVkbWQ5YXlqdnZraQ==

राजकुमार साठी यंदाच वर्ष सिनेमॅटिक मय झालं आणि या वर्षात त्याने आपल्या अभिनया साठी अनेक पुरस्कार देखील पटकावले. या वर्षी त्याची एक भूमिका गाजली आणि ती म्हणजे “पान टिपूची ” तो पुन्हा एकदा ही भूमिका पुन्हा साकारणार असल्याचं कळतंय. गन्स अँड गुलाब्स चा दुसरा सीझन कधी रिलीज होईल हे अद्याप निश्चित झालेले नसले तरी 2024 च्या सुरुवातीला याचा दुसरा भाग येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राजकुमार येणाऱ्या वर्षात याच शूट सुरू करणार असल्याचं कळतंय.

गन्स अँड गुलाब्स च्या दुसरा सीझन मध्ये राजकुमार राव आणि राज आणि डीके ही ड्रीम टीम टीम तिसऱ्यांदा एकत्र दिसणार आहे. राजकुमार राव यांनी पूर्वी सांगितले होते की या चित्रपट निर्मात्या जोडीसोबत त्याला काम करताना आनंद होतो कायम कारण ते नेहमीच आउट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी हटके करतात आणि त्यांच्या सोबतीने काम करण्याची मज्जा वेगळी असते.

पान टिपूच्या भूमिकेसाठी त्याने 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि वर्षातील सर्वोत्कृष्ट कलाकार पुरस्कार जिंकला आता प्रेक्षकांना नव्या सीजन ची उत्सुकता लागून राहिली आहे.

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये