क्रीडा व मनोरंजन
दबंग दिल्लीचा पटना पायरेटसवर संघर्षपूर्ण विजय…

मुंबई, 5 जानेवारी 2024: दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पूर्वार्धातील 13गुणांच्या पिछाडीनंतर उत्तरार्धात जबरदस्त पुनरागमन करूनही पटना पायरेटस संघाला दबंग दिल्ली कडून महत्वपूर्ण सामन्यात 37-38 असा केवळ एक गुणाने पराभव पत्करावा लागला.
एनएससीआय स्टेडियम झालेल्या या लढतीत दबंग दिल्लीकडून आशू मलिक(10गुण), पटना पायरेटस कडून सचिन (10गुण) आणि सुधाकर (9गुण) यांनी चमकदार कामगिरी केली.

त्याआधी पूर्वार्धात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या दबंग दिल्ली संघाने पटना पायरेटस वर 10व्या मिनिटाला पहिला आणि सहाव्या मिनिटांनी दुसरा असे सलग दोन लोन चढविले.
दबंग दिल्लीच्या मलिक, नीतू शर्मा आणि मनजीत यांनी पूर्वार्धात 20चढायात 13गुण मिळवले. मलिकने मध्यातरांपूर्वी एक सुपर रेड करताना आपली एकदाही पकड होऊ दिली नाही. सचिनने अनेकदा पायरेटसना पुनरागमनाची संधी मिळवून दिली होती. परंतु दिल्लीने आपले वर्चस्व कायम राखताना मध्यंतराला 13गुणांची आघाडी मिळवली.
उत्तरार्धात पटना पायरेटस च्या बचाव पटूना सुर गवसला आणि दबंग दिल्ली वर लोन चढवाताना पटना संघाने आपली पिछाडी सहा गुनांपर्यंत कमी केली. सचिनने सुपर रेड करताना पटना संघाला बरोबरीची संधी मिळवून दिली.
सचिन आणि सुधाकर यांच्या चढाया मुळे पटना संघाची पिछाडी केवळ तीन गुणांचीच राहिली होती. एका क्षणी पटना संघ बाजी मारण्याची चिन्हे होती. परंतु दिल्ली च्या खेळाडूंनी सायम राखताना केवळ एक गुणाने विजयाची नोंद केली.