Bollywood NewsEntertainment

सोनू सूदने ‘फतेह’ बद्दल सांगितली ही खास गोष्ट !

अभिनेता दिग्दर्शक सोनू सूद त्याच्या आगामी चित्रपट फतेहसाठी दिग्दर्शनाच्या भूमिकेत उतरला आहे. हा चित्रपट या वर्षात रिलीज होणार असून आज देशभरात होत असलेल्या सायबर गुन्ह्यांवर बारकाईने नजर टाकणार आहे. वास्तविक जीवनातील घटनांवर आधारित डिजिटल युगातील सायबर धोक्यांवर प्रकाश टाकून प्रेक्षकांचं मनोरंजन करणे आणि साध्या सोप्या पद्धतीने ते कसं टाळता येणार आहे हे या चित्रपटाचे उद्दिष्ट आहे. सोनू ने त्याच्या सोशल मीडिया वर एक पोस्ट शेयर करून कॅप्शन दिल आहे

“फतेह हा माझ्यासाठी खास आणि वैयक्तिक चित्रपट आहे. विविध स्तरांवर सायबर गुन्ह्यांचा बळी ठरलेल्या तरुणांना ही श्रद्धांजली आहे”

https://www.instagram.com/p/C13mVkHo5n5/?igsh=ZWt6emt1c3Zydmgz

चित्रपटाचे दिग्दर्शन , निर्मिती आणि अभिनय केलेल्या सोनू सूदसाठी फतेह हा खास आहे. त्याने या चित्रपटा साठी आपर मेहनत घेतली आहे. अनोख्या शूटिंग लोकेशन्स वर हा चित्रपट शूट झाला असून आदरणीय हॉलीवूड स्टंट करणाऱ्या ली व्हिटेकर यांच्या सोबत हे सहकार्य असणार आहे.

‘फतेह’ झी स्टुडिओज आणि त्यांची निर्मिती कंपनी शक्ती सागर प्रॉडक्शन सोनू सूद आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या सह-निर्मिती असणार आहे.

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये